Deepika Ranveer wedding photo : दीपिका रणवीरच्या लग्नाचा पहिला फोटो
Deepika and Ranveer's wedding pics out (Photo Credit: Instagram)

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग 14 नोव्हेंबारला इटलीतील लेक कोमो परिसरामध्ये एका सुंदर व्हिला परिसरात विवाहबद्ध झाले. लग्नानंतर ' दीप वीर' चे काही फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. परंतू या नवदांपत्याचा लग्नाचा खास फोटो पाहण्याची त्यांच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती. अखेर दीप वीरने जाहीर केल्यानुसार त्यांचा पहिला वाहिला फोटो शेअर करण्यात आला आहे.दीपिका पदुकोणच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर करण्यात आले आहेत.  दीपिका-रणवीरच्या लग्नसोहळ्याचे फोटो 'या' खास कारणासाठी इंटरनेटवर नाही दिसणार

 

View this post on Instagram

 

❤️

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

 

View this post on Instagram

 

❤️

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

नववधू दीपिका लाल लग्नाच्या जोड्यामध्ये मध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे तर रणवीरही रुबाबदार अंदाजात दिसत आहे. मोजक्याच कुटुंबियांच्या उपस्थिती मध्ये दीपिका आणि रणवीरचा विवाह सोहळा पार पडला. आधी बेंगलोरी (kannadiga style wedding) पद्धतीने साखरपुडा आणि लग्न झाले. त्यांनतर दोघांनी आज सिंधी पद्धतीने लग्न केले. मुंबईमध्ये येत्या 28 नोव्हेंबरला तर बेंगलोरमध्ये  21 नोव्हेंबारला दीप वीर च्या लग्नाचे रिसेप्शन होणार आहे. पाहा- दीपिका-रणवीर विवाहसोहळ्यातील व्हिडिओ

राम - लीला हा संजय लीला भंसाळी दिग्दर्शित सिनेमामध्ये रणवीर आणि दीपिका यांनी एकत्र काम केले. पुढे बाजीराव मस्तानी आणि यंदाच्या सुपरहीट सिनेमांपैकी एक असलेल्या पद्मावत सिनेमामध्येही दीपिका आणि रणवीर एकत्र होते. सुमारे 5 वर्षांहून अधिक काळ रिलेशनशीपमध्ये असलेली दीपिका आणि रणवीर सिंग ही जोडी आज विवाहबंधनात अडकली आहे.