Deepika-Ranveer Wedding: दीपिका-रणवीर विवाहसोहळ्यातील व्हिडिओ आला समोर
दीपिका-रणवीर (Photo Credits: File Photo)

बॉलिवूडची मस्तानी आणि बाजीराव अर्थात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग काल विवाहबद्ध झाले. इटलीतील लेक कोमो या व्हिलामध्ये हा विवाहसोहळा पार पडला.

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशा या विवाहसोहळ्याबद्दल चाहत्यांना भलतीच उत्सुकता होती. पण या विवाहसोहळ्याचे फोटोज काही चाहत्यांपर्यंत पोहचले नाही. पण विवाहसोहळ्यात एक खास व्हिडिओ समोर आला आहे. दीपिका-रणवीरच्या लग्नसोहळ्याचे फोटो 'या' खास कारणासाठी इंटरनेटवर नाही दिसणार

पाहा व्हिडिओ...

काल कोंकणी पद्धतीने विवाह संपन्न झाल्यानंतर आज दीपवीर सिंधी पद्धतीने विवाह करणार आहेत. त्यानंतर 28 नोव्हेंबरला मुंबईतील ग्रँट हयात मध्ये दीपवीरच्या लग्नाचे जंगी रिसेप्शन असणार आहे. या रिसेप्शन पार्टीत बॉलिवूडमधील अनेक स्टार्स हजेरी लावतील.