कोरियन हिट सिनेमा 'मिस ग्रॅनी'च्या रिमेकसाठी श्रद्धा कपूर साकारणार 74 वर्षाची आजीबाई
श्रद्धा कपूर (Photo Credits: Instagram)

आजवर नटखट भूमिका करणाऱ्या श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) ला येत्या काही दिवसात तुम्ही सुरकुतलेल्या चेहऱ्याने बघितलंत तर चकित होऊ नका.कारण श्रद्धाचा हा नवा लूक एका कोरियन हिट सिनेमाच्या रिमेकसाठी असणार आहे.प्रसिद्ध तेलुगू निर्माता सुरेश बाबू (Suresh Babu) 'मिस ग्रॅनी' (Miss Granny) या कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवणार आहे. या चित्रपटाच्या रिमेकमध्ये श्रद्धा एका 74 वर्षाच्या म्हाताऱ्या बाईची प्रमुख भूमिका साकारणार आहे.या शिवाय मिस ग्रॅनी सिनेमाचे तेलगू रिमेक देखील बनवण्यात येणार असून यात तेलुगू अभिनेत्री सामंथा अक्कीनेनी (Samantha Akkineni) प्रमुख भूमिका साकारणार आहे.

मिस ग्रॅनी हा कोरियन सिनेमा 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या कथेमध्ये एक 74 वर्षीय वृद्ध महिला फोटो स्टुडिओमध्ये आपल्या आयुष्यातला शेवटचा फोटो काढण्यासाठी जाते. मात्र, फोटो काढल्यानंतर चमत्कार होतो आणि ती 20 वर्षांची होते. त्यानंतर ती जीवनाचा नवा प्रवास सुरू करत संगीत क्षेत्रात आपलं करिअर घडवते. तसेच, ती आपल्या नातवासोबत बॅंड सुरू करते. नातवाला आपण आपल्या आजीसोबत बँडचे काम करतो याची माहिती सुद्धा नसते.श्रद्धा ही बॉलिवूड मध्ये आपल्या अभिनयासोबतच गाण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे या सिनेमामुळे श्रद्धाच्या सिंगिंग करिअरला देखील प्रोत्साहन मिळू शकते. Saaho Movie Poster: अभिनेता प्रभास चित्रपटाचे 'साहो' चित्रपटाचे नवीन पोस्टर आले समोर, प्रभासने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला फोटो

अलीकडे अनेक अभिनेत्री या केवळ फॅशनेबल भूमिका न करता आव्हानात्मक भूमिका करण्याला प्राधान्य देत आहेत. दीपिका पदुकोण देखील अशाच प्रकारे छपाक सिनेमात ऍसिड हल्ल्याची शिकार झालेल्या लक्ष्मीची भूमिका साकारत आहे. याचप्रमाणे आता श्रद्धा देखील नितीश तिवारी यांच्या 'छिछोरे' सिनेमात वृद्ध महिलेचे पात्र साकारताना दिसणार आहे. याआधी श्रद्धाने 'हसीना पारकर' या आपल्याहून अधिक वयाच्या स्त्रीची भूमिका साकारली होती. सध्या श्रद्धा अभिनेता प्रभासबरोबर 'साहो' आणि अभिनेता वरुण धवनबरोबर 'स्ट्रीट डान्सर ३डी'मध्ये काम करत आहे.