Actor Prabhas Saaho Poster (Photo Credits: Insta)

'बाहुबली'(Baahubali) या चित्रपटामुळे ख-या अर्थाने नावारुपास आलेला आणि आपल्या दमदार अभिनयाने अनेक तरुणींना घायाळ करणारा दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) लवकरच आपल्या नवीन चित्रपटामधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. ह्या चित्रपटाचे नाव 'साहो' (Saaho) असून नुकताच प्रभासने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ह्या चित्रपटाचा पोस्टर शेअर केला.

प्रभासने सोमवारी म्हणजेच 20 मे ला आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन "मी उद्या चाहत्यांना एक सरप्राईज देणार आहे" असे सांगितले होते. त्याच्या पोस्टनुसार त्यांनी आज या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. ह्या पोस्टरसोबत ह्या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख देखील समोर आली आहे. 15 ऑगस्ट ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ह्या पोस्टरमधील प्रभास लूक खूपच जबरदस्त असून प्रेक्षकांनी ह्या लूकला पसंतीची पावती दिली आहे.

 

View this post on Instagram

 

Hello darlings... A surprise coming your way, tomorrow. Stay tuned... #SaahoSurprise

A post shared by Prabhas (@actorprabhas) on

'साहो' हा चित्रपट तेलगू आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अॅक्शन थ्रिलर असलेल्या या चित्रपटामध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर(Shraddha Kapoor) प्रभाससोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

श्रद्धा कपूर हिच्या वाढदिवासावेळी प्रदर्शित झाला 'साहो' चित्रपटाचा टीझर, प्रभास सोबत करणार जबरदस्त धमाका (Video)

प्रभास-श्रद्धा सह या चित्रपटात जॅकी श्रॉफ(Jackie Shroff), मंदिरा बेदी(Mandira Bedi), महेश मांजरेकर(Mahesh Manjrekar), नील नितीन मुकेश(Neil Nitin Mukesh) ह्यांसारखी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.