Saaho आणि War नंतर आता Housefull 4 ही तामिलरॉकर्स वर लीक; Piracy चा चित्रपटांना पुन्हा दणका
Housefull 4 Starcast (Instagram)

काल प्रदर्शित झालेला 'हाऊसफुल 4' (Housefull 4) एका दिवसाच्या आतच तामिल रॉकर्स या वेबसाईटवर लीक झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पायरसीचा मुद्दा प्रकाशात आला आहे. गेल्या काही दिवसांतील हा तिसरा बिग बजेट चित्रपट आहे ज्याची पायरेटेड प्रिंट दुसऱ्या दिवशीच प्रेक्षकांच्या मोबाईलवर फिरते आहे. प्रभास आणि श्रद्धा कपूरचा 'साहो' आणि ह्रितिक आणि टायगरचा 'वॉर' सुद्धा असेच लीक झाले होते.

पायरसी बरेच वर्ष चित्रपटांसाठी मारक ठरत आहे. एखादा निर्माता आपले पैसे खर्च करून आणि कलाकार तंत्रज्ञ कष्ट घेऊन जेव्हा एखादी कलाकृती बनवतात, तेव्हा या सर्व गोष्टींचं चीज होणं महत्वाचं असतं. सिनेमा चांगला आहे की नाही हा मुद्दा यानंतरचा आहे. कारण ते तेव्हाच कळतं, जेव्हा बाकीची लोकं चित्रपट पाहून त्यावर चर्चा करतात, आणिआपली मतं मांडतात. पण त्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहापर्यंत पोचणं गरजेचं असतं. पण या अशा गोष्टींमुळे चित्रपटांचं खूप नुकसान होतं. एखाद्या कलाकाराचा किंवा दिग्दर्शकाचा चित्रपट जर अशा कारणामुळे चालला नाही तरीही पुढे जाऊन अपयश त्याच्या माथी लागत असतं. त्यामुळे शेवटी करियरला धोका निर्माण होण्याची भीती असते. म्हणुनच, चित्रपट वाईट आहे की चांगला आहे हा मुद्दा बाजूला ठेऊन त्या चित्रपटाला प्रेक्षकांपर्यंत पोचण्याची पूर्ण संधी उपलब्ध होणे खूप गरजेचं असतं. (हेही वाचा. खिलाडी अक्षय कुमारचे चित्रपट हिसकावतोय ‘हा’ बॉलिवूड अभिनेता)

साहोने लीक होऊन सुद्धा बऱ्यापैकी कमाई केली होती. तर वॉर ने कमाईचे अनेक विक्रम मोडीत काढले होते. पण तरीही पायरसीमुळे अजून वाढायची क्षमता असलेले कमाईचे आकडे काही प्रमाणात खुंटले होते असंच म्हणता येईल. अक्षय कुमारचे आधीचे 2 चित्रपट केसरी आणि मिशन मंगल हे सुद्धा लीक झाले होते. तरीही या चित्रपटांनी 100 कोटींच्या वर कमाई केली होती. आता हाऊसफुल 4 यातून मार्ग काढून किती कमावतो हे बघावं लागेल.