खिलाडी अक्षय कुमारचे चित्रपट हिसकावतोय ‘हा’ बॉलिवूड अभिनेता
Akshay kumar (Photo Credit - File Photo)

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay kumar )नेहमी सुपरहीट चित्रपट देतो. अक्षयची भूमिका असणारे चित्रपट नेहमी सुपरहीट होतात. तसेच बॉक्स ऑफिसवर चांगली कमाईही करतात. सध्या अक्षयचा ‘हाउसफुल 4’ आणि ‘लक्ष्मी बॉम्ब’ हे चित्रपट चांगलेच चर्चेत आहेत. परंतु, अक्षय कुमारच्या चित्रपटांचे सिक्वेल सलग दुसऱ्यांदा एका बॉलिवूड अभिनेत्याच्या नावावर गेले आहे. हा अभिनेता दुसरा कोणी नसून नुकतेच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेला कार्तिक आर्यन आहे.

कार्तिकने अक्षय कुमारचे 2 सिक्वेल आपल्या नावावर केले आहेत. काही दिवसांपूर्वी अक्षयचा सुपरहीट सिनेमाचा सिक्वेल ‘भूल भूलैय्या 2’ मधील कार्तिकचा फर्स्ट लुक रिलीज झाला होता. या सिनेमात कार्तिक अक्षय कुमारने साकारलेली भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे कार्तिकने अक्षयच्या आणखी एका चित्रपटाचा सिक्वेल आपल्या नावावर केला आहे. अक्षय कुमारची भूमिका असणारा विनोदी चित्रपट ‘हेरा फेरी 3’ हा सिनेमादेखील कार्तिकने साइन केला असल्याची माहिती हाती येत आहे.

हेही वाचा - 'Mission Mangal' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमार-विद्या बालन मध्ये झाला राडा, पाहा व्हायरल व्हिडिओ

कार्तिक आर्यनच्या एका फॅनक्लबने हे वृत्त इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. कार्तिकने ‘भूल भूलैय्या 2’ नंतर लगेचचं ‘हेरा फेरी 2’ सिनेमाही साइन केला आहे, असं फिल्म फेअर मासिकातील लेखात म्हटलं आहे. कार्तिकने नुकतेच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याने साकारलेल्या अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच गाजले. सध्या कार्तिक त्याच्या 2 आगामी सिनेमांची तयारी करत आहे. 'लव्ह आज कल 2' चित्रपटात कार्तिक सारा अली खानसोबत झळकणार आहे. तसेच 'पति पत्नी और वो' या चित्रपटात कार्तिक भूमि पेडणेकर आणि अनन्या पांडे यांच्यासोबत भूमिका साकारताना दिसणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सारा व कार्तिक एकमेकांना डेट करत होते. परंतु, मागील आठवड्यात त्यांचे नाते संपुष्टात आले आहे.