'Mission Mangal' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमार-विद्या बालन मध्ये झाला राडा, पाहा व्हायरल व्हिडिओ

अक्षयसोबतचे या अभिनेत्रींचे धमालमस्तीचे बरेच व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. त्यात आता अभिनेत्री विद्या बालन सोबत एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. यात अक्षय आणि विद्या एकमेकांसोबत मारामारी करताना दिसत आहे. ज्याचे चित्रीकरण खुद्द सोनाक्षी सिन्हा करत असून त्याच्यावर कॉमेंट्रीही देत आहे.

'Mission Mangal' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमार-विद्या बालन मध्ये झाला राडा, पाहा व्हायरल व्हिडिओ
Akshay Kumar and Vidya Balan (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार (Akshay Kumar) याची प्रमुख भूमिका असलेला 'मिशन मंगल' (Mission Mangal) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात अक्षयसोबत विद्या बालन (Vidya Balan), सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha), तापसी पन्नू (Taapsee Pannu), शर्मन जोशी (Sharman Joshi) बरीच दिग्गज कलाकार पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत 5 अभिनेत्री झळकत असल्यामुळे शूटिंगदरम्यान अक्षय कुमारने या अभिनेत्रींना किंवा त्यांनी अक्षयला खूप सतावले असणार हे वेगळं सांगायची गरज नाही. अक्षयसोबतचे या अभिनेत्रींचे धमालमस्तीचे बरेच व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. त्यात आता अभिनेत्री विद्या बालन सोबत एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे.

यात अक्षय आणि विद्या एकमेकांसोबत मारामारी करताना दिसत आहे. ज्याचे चित्रीकरण खुद्द सोनाक्षी सिन्हा करत असून त्याच्यावर कॉमेंट्रीही देत आहे. पाहा व्हिडिओ

याआधीही मागे अक्षयचा सोनाक्षी सोबतचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात अक्षय सोनाक्षीला मेकअप करत असताना अक्षयने सोनाक्षीची चांगलीच टेर खेचली.

हेही वाचा- सोनाक्षी सिन्हाचा मेकअप करत असताना अक्षयकुमारने केलेल्या या टवाळकीमुळे अक्कीला पडले फटके, पाहा मजेशीर व्हिडिओ

‘मिशन मंगल’ या सिनेमात इस्रो वैज्ञानिकांच्या मेहनतीची कथा साकारण्यात आली आहे. एक रॉकेट अंतराळात पाठवण्यासाठी कशापद्धतीनं तयारी केली जाते याचं चित्रण या सिनेमात करण्यात आलं आहे. हा चित्रपट स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर म्हणजेच 15 ऑगस्टला प्रदर्शित झाला.

(The above story first appeared on LatestLY on Aug 16, 2019 10:08 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).