सोनाक्षी सिन्हाचा मेकअप करत असताना अक्षयकुमारने केलेल्या या टवाळकीमुळे अक्कीला पडले फटके, पाहा मजेशीर व्हिडिओ
Akshay Kumar and Sonakshi Sinha (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या त्याच्या आगामी सिनेमा 'मिशन मंगल' (Mission Mangal) च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्या सोबत एक नाही, दोन नाही तर तब्बल 5 अभिनेत्री झळकणार आहेत. त्यामुळे प्रमोशनवेळी या अभिनेत्रींसोबतच त्याला जावे लागत असेल हे वेगळं सांगायची गरज नाही. . इतक्या अभिनेत्रींसोबत अक्कीने एकत्र काम केले म्हणजे अक्षयच्या खोडकरपणाने हद्द पार केली असणार हे वेगळं सांगायची गरज नाही. कारण या आधीही अक्षयने आपल्या सहकलाकारासोबत ऑन सेट, ऑफ सेट केलेले प्रँक्स बरेच व्हायरल झालेले आहेत. मिशन मंगलच्या प्रमोशन दरम्यानचा एका नवा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत अक्षयकुमार चक्क सोनाक्षी सिन्हाला (Sonakshi Sinha) मेकअप करत असून ते करत असताना त्याने जो खोडकरपणा केला, त्याचा काय परिणाम झाला ते पाहा

हा व्हिडिओ शेअर करताना सोनाक्षीनं त्याला कमी बजेटवाला मेकअपमन असं कॅप्शन दिलं आहे. सोशल मीडियावर या फनी व्हिडिओला चाहत्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा व्हिडिओ मिशन मंगलच्या प्रमोशनच्या आधीचा असल्याचं दिसत आहे.

हेही वाचा- Yeh Sindoor Marathi: नारी शक्तीला सलाम करणारा 'अक्षय कुमार' च्या आवाजातील Mission Mangal चा खास मराठी प्रोमो (Watch Video)

'मिशन मंगल' या सिनेमात अक्की एका वैज्ञानिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. यात सोनाक्षी सिन्हा, विद्या बालन (Vidya Balan), तापसी पन्नू (Taapsee Pannu), किर्ती कुल्हारी, शर्मन जोशी (Sharman Joshi) यांसारख्या ब-याच दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे.

‘मिशन मंगल’ या सिनेमात इस्रो वैज्ञानिकांच्या मेहनतीची कथा साकारण्यात आली आहे. एक रॉकेट अंतराळात पाठवण्यासाठी कशापद्धतीनं तयारी केली जाते याचं चित्रण या सिनेमात करण्यात आलं आहे. हा चित्रपट स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर म्हणजेच 15 ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या सिनेमाबाबत प्रेक्षकांच्या मनात बरीच उत्सुकता आहे.