Mission Mangal (Photo Credits: Instagram)

भारताची यशस्वी मंगळयान (Mangalyaan) मोहिम रुपेरी पडद्यावर मांडण्यासाठी येत्या 15 ऑगस्टला मिशन मंगल (Mission Mangal) हा बहुप्रतीक्षित सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी अक्षय कुमार (Akshay Kumar) सह, विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, किर्ती कुल्हारी, शर्मन जोशी व अन्य दिग्गज कलाकारांची भली मोठी स्टार कास्ट सिनेमाच्या प्रमोशनमध्ये गुंतली आहे. याचाच भाग म्ह्णून आज, अक्षय कुमारच्या आवाजात एक कविता सादर करणारा 'ये सिंदूर'(Yeh Sindoor)  हा प्रोमो रिलीज करण्यात आला. मंगळयान मोहिमेत मोलाचा हातभार लावलेल्या नारीशक्तीला सलाम करण्यासाठी हा प्रोमो बनवला असून या मध्ये सिनेमाची झलक पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे हा प्रोमो हिंदी सह मराठी भाषेतही रिलीज करण्यात आला आहे, ज्यात अक्षयने मराठीतून ये सिंदूर कविता सादर करून मराठी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

पहा 'ये सिंदूर मराठी' प्रोमो

ये सिंदूर हा प्रोमो अक्षयने आपल्या इंस्टग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे. या पोस्ट मध्ये अक्षयने "हे आभाळ जितक्या उंचीवर आहे तितक्या उंचीवर हे सिंदूर जाणार आहे" असे म्हणत हा प्रोमो आपली स्वप्ने पूर्ण करण्याची हिंमत ठेवणाऱ्या भारतीय महिलांना समर्पित असल्याचे सांगितले आहे.  Mission Mangal Trailer: भारताला मंगळापर्यंत घेऊन जाण्याचा अवघड आणि अशक्य प्रवास उलघडणारा 'मिशन मंगल' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित! (Watch Video)

अक्षय कुमार इंस्टाग्राम पोस्ट

दरम्यान, सिनेमाचा दमदार ट्रेलर आणि ये सिंदुरच्या रूपातील प्रोमो पाहून आता प्रेक्षकांमध्ये सिनेमासाठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. मिशन मंगल हा सिनेमा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या यशस्वी मंगळयान मोहिमेवर आधारित आहे, काही आठवड्यांपूर्वी सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला होता. यामध्ये दाखवल्याप्रमाणे, मंगळयान मोहिमेत महिला वैज्ञानिकांनी केलेल्या योगदानाचे कौतुक करणे हा देखील कथानकाचा एक पैलू असल्याचे समजते.