Photo Credit- X

Kannappa: बहुप्रतिक्षित कन्नप्पा (Kannappa) चित्रपटातील प्रभासचा पहिला लूक आता (Prabhas First Look)समोर आला आहे. या चित्रपटात प्रभास रुद्रच्या भूमिकेत दिसणार आहे. 'कन्नप्पा' चित्रपटाची रिलीज तारीखही निश्चित झाली आहे. तो 25 एप्रिल 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज होईल. कन्नप्पा हा संपूर्ण भारतात प्रदर्शित होणारा चित्रपट आहे. जो तेलुगू, मल्याळम, तमिळ, कन्नड आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटात प्रभास व्यतिरिक्त विशाल मंचू आणि प्रीती मुखुंदन हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटातील इतर प्रमुख पात्रांमध्ये मोहनलाल, अक्षय कुमार आणि काजल अग्रवाल यांचा समावेश आहे. ज्यामुळे चित्रपट आणखी रोमांचक बनतो.

'कन्नप्पा' मधील प्रभासचा लूक

या चित्रपटाचे दिग्दर्शन मुकेश कुमार सिंग यांनी केले आहे. तर निर्मिती एम मोहन बाबू यांनी केली आहे. प्रभासच्या पहिल्या लूकनंतर चित्रपटातील स्टारकास्ट आणि त्यांच्या भूमीकांविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवली आहे. कन्नप्पा हा चित्रपट अ‍ॅक्शन, ड्रामा आणि रोमान्सने भरपूर असल्याचे सांगण्यात येत आहे. (Sky Force Box Office Collection Day 9: 'स्काय फोर्स' ने अक्षय कुमारच्या या हिट चित्रपटाचा विक्रम मोडला )

मुकेश कुमार सिंग दिग्दर्शित, कन्नप्पा हा चित्रपट महादेवच्या भक्तांपैकी एक असलेल्या कन्नप्पाच्या कथेवर आधारित आहे. या चित्रपटात अक्षय कुमार विष्णूच्या भूमिकेत आहेत. कन्नप्पा तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, हिंदी आणि इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.