श्रद्धा कपूर हिच्या वाढदिवासावेळी प्रदर्शित झाला 'साहो' चित्रपटाचा टीझर, प्रभास सोबत करणार जबरदस्त धमाका (Video)
अभिनेत्री श्रद्धा कपूर (फोटो सौजन्य-युट्युब)

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आज तिचा 32 वा वाढदिवस साजरा करणार आहे. याच दिवशी तिचा आगामी चित्रपट 'साहो' (Saaho) या चित्रपटाचा दुसरा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत प्रसिद्ध अभिनेता प्रभास (Prabhas) सुद्धा मुख्य भूमिका साकारणार आहे. 'शेड्स ऑफ साहो चॅप्टर 2' (Shades of Saaho Chapter 2) या नावाने हा व्हिडिओ प्रदर्शिक करण्यात आला आहे. टीझर खुपच सुंदर आहे. श्रद्धा कपूर आणि प्रभास या चित्रपटातून जबरदस्त अॅक्शनसह दिसून येणार आहे. तर श्रद्धा तर या टीझरमध्ये अप्रतिम दिसत आहे. त्याचसोबत शेड्स ऑफ साहो चॅप्टर 1 प्रेक्षकांना फारच आवडली होती.

प्रभास ह्याने शेड्स ऑफ साहो चॅप्टर 2 चा व्हिडिओ आपल्या ट्वीटर अकाउंटवरुन पोस्ट केला आहे. त्याचसोबत श्रद्धा कपूर हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

साहो चित्रपटात अभिनेता नील नितिन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे यांच्यासारखे कलाकार मुख्य भुमिका साकारताना दिसणार आहेत. यूवी क्रियेशन प्रोडक्शन आणि टी-सिरिज मिळून हा चित्रपट प्रदर्शित करणार आहेत. या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाला वामसी, प्रमोद आणि विक्रम यांनी मिळून निर्मिती केली आहे. त्याचसोबत चित्रपटाचे दिग्दर्शन सुजीत यांनी केले आहे. येत्या 15 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.