ओव्हल मैदानाबाहेर परदेशी भेळपुरी विक्रेत्याला पाहून अमिताभ बच्चन यांचे खास ट्विट

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याने बीग बींसह चाहते देखील त्रासले होते. मुंबई पोलिस (Mumbai Police) आणि सायबर सेल टीमच्या (Cyber cell team) मदतीने अकाऊंट रिकव्हर करण्यात आले. आणि या रिकव्हरीसोबतच सोशल मीडियावर सातत्याने सक्रीय असणारे अमिताभ बच्चन पुन्हा एकदा अॅक्टीव्ह झाले. आज बीग बी यांनी भेळपुरी विकणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ शेअर करत खास मेसेज लिहिला आहे. (अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाउंट हॅक, भारताच्या विरोधात ट्विट व्हायरल)

रविवार (9 जून) रोजी लंडनच्या ओव्हल मैदानावर झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. या विजयाचा आनंद नागरिकांनी सोशल मीडियावर जाहिर केला. त्यात एक परदेशी व्यक्ती भेळपूरी विकताना दिसत आहे. (डान्सिंग अंकल संजीव श्रीवास्तव यांच्या डान्सवर खुद्द अमिताभ बच्चन ही फिदा)

या व्हिडिओत एक व्यक्ती आपल्या मजेदार स्टाईलमध्ये भेळ विकताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहुन खुद्द बिग बीं ना देखील त्यावर प्रतिक्रीया दिली आहे.

अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रीया:

व्हिडिओतील हा परदेशी भेळ विक्रेता सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या कुतूहलाचा विषय ठरत आहे.