Amitabh Bachchan Twitter hacked (Photo Credits: Screenshot from Twitter)

अलीकडे ट्विटर (Twitter) वरून बरेच सक्रिय असणाऱ्या बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)  यांचे ट्विटर अकाउंट काल रात्रीपासून हॅक झाले होते . याबाबत मुंबई पोलिसांनी दखल घेऊन तपासाला सुरवात केली असता यामध्ये 'अय्यिलदीझ तिम' (Ayyıldız Tim Turkish Cyber Armny) तुर्किश संघटनेचा हात असल्याचे समोर आले आहे. या हॅकर्सने काल म्हणजेच सोमवारी रात्री उशिरा अमिताभ यांचे अकाउंट हॅक केले, त्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी या अकाउंटचा प्रोफाइल फोटो बदलून त्या जागी पाकिस्तनचे पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांचा फोटो लावला. या सोबतच त्याच्या बायो(माहिती) मध्ये "ऍक्टर.. आतापर्यंत सगळे असं म्हणतायत तरी.. I Love Pakistan" असे लिहून त्यापुढे तुर्कीच्या झेंड्याचा ईमोजी देखील जोडण्यात आला होता.

अय्यिलदीझ तिम या संघटनेने बिग बी यांचे अकाउंट हॅक करून त्यावरून भारताच्या विरोधात व पाकिस्तानच्या बाजूने मत मांडणारे अनेक ट्विट केले होते. रमजानच्या पवित्र महिन्यात रोजा चालू असताना निर्दयी भारताने पाकिस्तानच्या उम्म्हा मुहम्मद यांच्यावर या वयात हल्ला केला असे एका ट्विट मध्ये म्हणण्यात आले आहे तर या संघटनेने आइसलॅंडने तुर्कस्तानच्या फुटबॉलपटूंना दिलेल्या वागणूकीचा निषेध केला. तसंंच अमिताभ बच्चनच्या ट्विटर अकाउंटवर आपण सायबर हल्ला केला असल्याची माहिती देणारं ट्विटही त्यांनी केलं. या व्यतिरिक्त हॅकर्सनी इम्रान खान यांचे दोन फोटो पोस्ट करत त्याखाली लव्ह यु पाकिस्तान असे कॅप्शन लिहिले होते.

 अमिताभ बच्चन यांच्या हॅक अकाऊंटवरून केलेले ट्विट

Amitabh Bachchan Twitter hacked (Photo Credits: Instagram)
Amitabh Bachchan Twitter hacked (Photo Credits: Instagram)
Amitabh Bachchan Twitter hacked (Photo Credits: Instagram)

आता अमिताभ यांचे अकाउंट पुन्हा प्राप्त करण्यात आले आहे तसेच बिग बी यांनी आज सकाळी आपल्या हॅन्डल वरून काही फोटो आणि कॅप्शन्स देखील शेअर केले आहेत. तसेच हे सर्व फेक ट्विट्स अमिताभ यांच्या अकाउंटवरून हटवण्यात आले आहेत.  याआधी अनेकदा बिग बी यांचे अकाउंट हॅक  झाल्याचे प्रसंग घडले होते तसेच  शाहिद कपूर याचे अकाउंट देखील अलीकडे  अशाच प्रकारे हॅक झाले होते.   सावधान! 'या' फोटोंवर क्लिक करण्यापूर्वी विचार करा, नाहीतर तुमचा मोबाईल हॅक होईल

अमिताभ बच्चन ट्विट

एका तुर्किश हॅकर्स संघटनेने अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाउंट हॅक करून त्यावरून पाकिस्तानला पाठिंबा देणारे काही ट्विट्स काल रात्री केले होते. याबाबत आता मुंबई पोलिसांच्या सायबर सेल अंतर्गत तपास सुरु आहे.