Sanjeev Srivastava (Photo Credits: YouTube)

काही दिवसांपूर्वी गोविंदा स्टाईल डान्स करणारे डब्बू अंकल सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. अलिकडेच त्यांनी एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून त्याला खुद्द बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांची दाद मिळाली आहे.

डब्बू अंकल यांनी अमिताभ बच्चन यांच्या 'खैके पान बनारस वाला' या गाण्यावर डान्स केला. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी बिग बींना ही टॅग केलं. तसंच व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिलं की, "खूप हिंमत करुन तुमच्या गाण्यावर डान्स करण्याचा प्रयत्न केला." या व्हिडिओवर डब्बू अंकल यांना बिग बीं कडून 'सुपर' अशी प्रतिक्रीया मिळाली आहे.

पहा डान्स व्हिडिओ:

अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रीया:

एका लग्नात केलेल्या डान्समुळे डब्बू अंकल प्रकाशझोतात आले होते. त्यानंतर त्यांनी एका जाहिरातीत देखील काम केले होते.