Akash Ambani Shloka Mehta Wedding: जगप्रसिद्ध व्यापारी मुकेश अंबानी (Mukesh Ambani) ह्यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी (Akash Ambani) ह्याचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. या रॉयल वेडिंगसाठी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज मंडळींची उपस्थिती पाहायला मिळाली. त्यात लग्नसोहळ्यावेळी प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) या दोघी प्रथमच एकत्र थिरकताना दिसून आल्या आहेत. तसेच दोघी या मिस वर्ल्ड पुरस्काराच्या मानकरी ठरल्याने त्यांचा हा डान्स पाहण्यासारखा होता. सोशल मीडियावर सध्या या दोघींचा डान्स प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये प्रियांका आणि ऐश्वर्या मध्ये एकत्र डान्स करतानाची ही पहिलीच वेळ आहे. त्याचसोबत करण जोहर, हार्दिक पांड्या सुद्धा थिरकताना दिसून आले. वेडिंग सेलिब्रेशनसाठी प्रियांका आणि ऐश्वर्या यांनी घातलेले कपडे फारच अप्रतिम होते. तसेच करण आणि हार्दिक पांड्या यांची दोस्ती यावेळी फारच चर्चेत होती.(हेही वाचा-Akash Ambani Shloka Mehta Wedding: आकाश अंबानी सोबत वरातीमध्ये थिरकला शाहरुख खान, करण जोहर आणि रणबीर कपूर (Watch Video)
Another video of #AishwaryaRaiBachchan and @priyankachopra dancing together at the #AmbaniWeding baraat!
PS I wonder what ash whispered in PCs ear pic.twitter.com/4D7VgG76m4
— Bewitching Bachchans (@TasnimaKTastic) March 9, 2019
आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा विवाहसोहळा शनिवारी बांद्रा कुर्ला कॉप्लेक्स येथील जियो वर्ल्ड सेंटर येथे पार पडला. लग्नात बॉलिवूड कलाकारांसह बड्या उद्योगजकांची उपस्थिती दिसून आली.