Akash Ambani Shloka Mehta Wedding: आकाश अंबानी सोबत वरातीमध्ये थिरकला शाहरुख खान, करण जोहर आणि रणबीर कपूर (Watch Video)
Karan Johar, SRK, Ranbir (Photo Credits: Instagram)

मुंबईच्या जियो वर्ल्ड सेंटरमध्ये (Jio World Centre) आज मुकेश आणि नीता अंबानी (Neeta AMbani)  यांचा मोठा मुलगा आकाश अंबानींचं लग्न (Akash Ambani Wedding)  पार पडतंय. देशापरदेशातून अनेक मान्यवरांनी या लग्नाला हजेरी लावली आहे. आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांच्या शाही लग्नाला आजपासून सुरुवात झाली आहे. पुढील तीन दिवस या शाही सोहळ्याचे विधी सुरु राहणार आहेत. आज जियो वर्ल्ड सेंटरमध्ये आकाश अंबानी यांच्या लग्नाची वरात निघाली होती. या वरातीमध्ये अंबानी कुटुंबासोबतच बॉलिवूडलाच्या कलाकारांनीही ठेका धरला होता. शाहरुख खान (Shahrukh Khan), करण जोहर (Karan Johar), रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हे नीता अंबानी (Neeta Ambani), मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नवरदेव आकाश अंबानी (Akash Ambani)  यांच्यासोबत थिरकताना दिसले. Akash Ambani Shloka Mehta Wedding: मुंबईतील 'Jio World Centre' वर पोहचले अनिल व मुकेश अंबानी कुटुंबीय (Photos)

Isha Ambani (File Photo)
SRK, Karan Johar (File Photo)

सोशल मीडियामध्ये आकाश अंबानींच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ झपाट्याने शेअर होत आहेत. राजकारण, उद्योग, टेक्नोलोजी अशा क्षेत्रातील अनेक दिग्गजांची मांदियाळी आकाश अंबानींच्या लग्नामध्ये पाहायला मिळाली. जियो वर्ल्ड सेंटरमध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.