मुंबईच्या जियो वर्ल्ड सेंटरमध्ये (Jio World Centre) आज अंबानी कुटुंबियातील दुसरं भव्य लग्न पार पडणार आहे. आकाश अंबानी (Akash Ambani) आणि श्लोका मेहता (Shloka Mehta) आज विवाह बंधनात अडकणार आहेत. आज संध्याकाळी पार पडणाऱ्या या विवाहसोहळ्यासाठी मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि अनिल अंबानी (Anil Ambani) यांचे कुटुंब लग्न सोहळ्याच्या ठिकाणी पोहचले आहे. थोड्याच वेळात आकाश आणि श्लोकाच्या लग्नसोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी, ईशा पिरामल, अनंत अंबानी साऱ्यांनेच कपडे गुलाबी रंगामध्ये डिझाईन करण्यात आले आहेत. विवाह स्थळावर अंबानी कुटुंबासोबतच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावायला सुरुवात केली आहे. यामध्ये जॅकी श्रॉफ, विशाल - शेखर, आमिर खान, किरण राव यांनी हजेरी लावली आहे. मुंबईच्या बीकेसी परिसरामध्ये आज चोख सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्था ठेवण्यात आली आहे. विवाह स्थळावर फुलं आणि लाईटिंगची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
आकाश अंबानी त्याची मैत्रीण श्लोकासोबत आज विवाहबंधनात अडकणार आहे. या लग्न सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील सुमारे 5000 मान्यवर उपस्थिती लावणार आहेत.