Aishwarya Rai Bachchan: ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांना सुद्धा कोरोनाची लागण; सुदैवाने जया बच्चन COVID 19 निगेटिव्ह
Aishwarya Rai Bachchan Aradhya Bachchan Tested COVID 19 Positive (Photo Credits: Filmrfare)

बच्चन कुटुंबाशी संबंधित आणखीन एक मोठी माहिती समोर आली आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या पाठोपाठ आता ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि आराध्या बच्चन (aradhya Bachchan) या दोघींना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे समजत आहे. सुदैवाने जया बच्चन (Jaya Bachchan) आणि श्वेता नंदा (Shweta Nanda)  यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. काही वेळापूर्वी या सर्वांचे अँटीजन रिपोर्ट निगेटिव्ह आले होते मात्र ऐश्वर्या आणि आराध्याचे अंतिम रिपोर्ट हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सध्या समजत आहे.  या संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांंनी ट्विट करुन माहिती दिली आहे तसेच बच्चन कुटुंबाच्या लवकर रिकव्हरी साठी टोपे यांंनी प्रार्थना सुद्धा केली  आहे.

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची कोरोनातून सुटका व्हावी यासाठी उज्जैन येथे पूजेचे आयोजन, पहा फोटो

राजेश टोपे ट्विट

आज प्रशासनाच्या नियमावलीनुसार, कोरोनाबाधितांचे निवासस्थान सॅनिटाईज करून कॉन्टक्ट ट्रेसिंगच्या कामासाठी मुंबई महानगर पालिकेचे कर्मचारी पोहचले. बीएमसीकडून बिग बींचा 'जलसा' बंगला परिसरात निर्जतुकीकरण करण्यात आले असून त्यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारावर containment zone चा बॅनर लावण्यात आला आहे.

बच्चन कुटूंबीयांचे निवासस्थान आता प्रबंधित क्षेत्र घोषित झाल्याने पुढील 14 दिवस कुणालाही आत-बाहेर करता येणार नाही. सध्या 'जलसा' मध्ये असणारी सारी मंडळी आतमध्येच राहणार आहेत. दरम्यान बाहेरूनदेखील कोणाला जलसावर जाऊन बच्चन कुटुंबाची भेट घेता येणार नाही.

दरम्यान, अमिताभ आणि अभिषेक यांच्यावर जुहू येथील नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दोघांचीही प्रकृती स्थिर असून लवकरच ते कोरोनावर मात करतील अशी खात्री डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.