मुंबई: अमिताभ बच्चन यांचा 'जलसा' बंगला BMC कडून सॅनिटाईझ; प्रवेशद्वारावर containment zone चा बॅनर
BMC At JALSA | Photo Credits: Twitter/ ANI

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) या दोघांनाही कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झाल्यानंतर त्यांना काल (11 जुलै) मुंबईतील जुहू परिसरातील नानावटी सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आज प्रशासनाच्या नियमावलीनुसार, कोरोनाबाधितांचे निवासस्थान सॅनिटाईज करून कॉन्टक्ट ट्रेसिंगच्या कामासाठी मुंबई महानगर पालिकेचे कर्मचारी पोहचले. बीएमसीकडून बिग बींचा 'जलसा' बंगला परिसरात निर्जतुकीकरण करण्यात आले असून त्यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारावर containment zone चा बॅनर लावण्यात आला आहे.

बच्चन कुटूंबीयांचे निवासस्थान आता प्रबंधित क्षेत्र घोषित झाल्याने पुढील 14 दिवस कुणालाही आत-बाहेर करता येणार  नाही. सध्या 'जलसा' मध्ये असणारी सारी मंडळी आतमध्येच राहणार आहेत. दरम्यान बाहेरूनदेखील कोणाला जलसावर जाऊन बच्चन कुटुंबाची भेट घेता येणार नाही.

दरम्यान बच्चन कुटुंबीयांमध्ये जया बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन यांची अ‍ॅन्टीजन टेस्ट निगेटीव्ह आली आहे. दरम्यान अभिषेक आणि अभिताभ बच्चन यांच्या संपर्कात आलेले मागील 10 दिवसांमधील लोकांचा तपास आणि चाचणी सुरू आहे. काल बीग बी अमिताभ बच्चन यांनीदेखील त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना टेस्ट करून घ्या असं आवाहन केलं आहे. नानावटी हॉस्पिटलकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार बीग बी आयसोलेशन वॉर्डमध्ये असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. लवकरच ते कोविड 19वर मात करतील.

ANI Tweet 

बीएमसीकडून निर्जंतुकीकरण   

अभिषेक बच्चन Breathe: Into The Shadows या वेब सीरीज साठी मागील काही दिवस रेकॉर्डिंगसाठी ज्या स्टुडिओमध्ये जात होता तो देखील आता तात्पुरता बंद करण्यात आला आहे. फिल्म क्रिटिक कोमल नाहटा यांनी सोशल मीडियामधून याबाबतची माहिती दिली आहे.