
सध्या लॉकडाऊन मुळे अनेक जण गावाला अडकले आहेत. त्याचप्रमाणे अनेक आपल्या गावाला, आपल्या फार्म हाऊस मध्ये अडकले आहेत. अशीच काहीसे अभिनेत्री जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) हिच्या बाबतीत घडले आहे. लॉकडाऊनमुळे आपल्या मुलांसह आपला पती रितेश देशमुख यांच्या गावी अडकली आहे. मात्र तिने या लॉकडाऊनची झळ आपल्या मुलांना न देता गावात छान निसर्गाच्या सान्निध्यात आनंद कसा घ्यायचा याचे धडे देत आहेत. यासाठी तिने आपल्या शेतात जाऊन आपल्या मुलांना एका छान झाडाखाली बसवून त्यांच्या अभ्यास घेतानाच सुंदर व्हिडिओ तिने शेअर केला आहे.
जेनेलियाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ती आपली मुले रिआन आणि राहिल ला एका मोठाल्या झाडाखाली बसवून त्यांचाय अभ्यास घेताना दिसत आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया च्या प्रेमाला लॉकडाऊन काळात आला बहर, संजय दत्त च्या लोकप्रिय गाण्यावर बनवला TikTok व्हिडिओ
पाहा व्हिडिओ:
या व्हिडिओच्या माध्यमातून जेनेलियाने खूप छान संदेश दिला आहे. "कोरोना व्हायरस मुळे अनेक पालकांच्या मनात ही भाती आहे की आपल्या मुलांचे भविष्य का असेल. मात्र त्यातही आपल्या मुलांना आपल्या मातीशी जाण राहावी यासाठी लॉकडाऊन काळात आम्ही आमच्या गावी राहत असलेला काळ खूप छान एन्जॉय करत आहोत. गार हवा, शेती अशा निसर्गाच्या सान्निध्यात मुलांचा अभ्यास घेण्यातही एक वेगळी मजा आहे. मुलंही या गोष्टीचा छान आनंद घेत आहे" असे जेनेलियाने या व्हिडिओखाली म्हटले आहे.