महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारचे अभिनेत्री डॉली बिंद्रा हिच्याकडून अभिनंदन
Dolly Bindra (Photo Credits-Instagram)

महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांची मदत घेत सरकार स्थापन केले. मात्र हे सरकार फक्त 80 तासाचमध्ये कोसळल्याचे दिसून आले. कारण भाजपला बहुमताचा आकडा पार न करता आल्याने प्रथम अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता महाविकासआघाडी  सरकार राज्यात स्थापन होणार असल्याच्या पार्श्वभुमीवर बॉलिवूड मधील वादग्रस्त अभिनेत्री म्हणून ओखळल्या जाणाऱ्या डॉली बिंद्रा हिने (Dolly Bindra) महाराष्ट्रातील नव्या सरकारचे अभिनंदन केले आहे. याबाबत डॉली हिने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि शिवसेनेचे (Shiv Sena) सुद्धा कौतुक केले आहे.

मंगळवारी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानुसार आज महाविकास आघाडी सत्ता स्थापन करणार आहे. या पार्श्वभुमीवर राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन आयोजित केले आहे. यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री आणि अन्य सर्व आमदर शपथ घेणार आहेत. डॉली बिंद्रा हिने ट्वीट करत असे म्हटले आहे की, शरद पवार जी तुम्ही तर कमालच केली. त्याचसोबत #PawarSoniaSena म्हणत त्यांचे सुद्धा अभिनंदन केले आहेत.(देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात '3' गोष्टींमध्ये आहे साम्य)

डॉली बिंद्रा ट्वीट: 

महाशिवआघाडीकडून महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 28 नोव्हेंबरला शिवतीर्थावर शपथ घेणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. त्याचसोबत विधानसेभेच्या हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांची निवड करण्यात आली आहे.