Google Maps मध्ये कंपनी जोडणार नवे फिचर, आता चालकांना मिळणार इको फ्रेंडली मार्गाचा पर्याय
Google Maps (Photo Credits: IANS)

गुगल मॅपच्या माध्यमातून लाखो लोक नेहमीच प्रवास करतात. सध्या हाच प्रवास आणखी सुखकर करण्यासाठी गुगलने घोषणा केली आहे की, त्यांचा मॅप आता चालकांना असे मार्ग दाखवणार जे पर्यावरणासाठी अनुकूल आहेत. कंपनीने हे आवाहन जगात सुरु असलेल्या जलवायू परिवर्तनापासून सुटका मिळवण्याच्या मदतीच्या हेतूने केले आहे. हे नवे फिचर या वर्षाच्या अखेरपर्यंत अमेरिकेत लॉन्च केले जाणार आहे. त्यानंतर अन्य देशात उपलब्ध करुन दिले जाईल.(Xiaomi घेऊन येणार हाय रेंज मधील इलेक्ट्रिक वाहन, 'या' कंपनीच्या फॅक्ट्रीत तयार केली जाणार)

या फिचरच्या मदतीने डिफॉल्ट रुपात मॅप चालकांना पर्यावरण-अनुकूल मार्गांबद्दल सुचना देणार. मात्र या रस्तांवर वेळेचा सुद्धा विचार केला जाणार आहे. कमीत कमी वेळात व्यक्तीला त्यांच्या लोकेशनवर पोहचता येणार आहे. गुगलचे एक उत्पाद निर्देशक रसेल डिकर यांनी रायटर्सच्या हवाल्यानुसार, आम्ही जे पाहत आहोत ते जवळजवळ अर्ध्या मार्गासाठी आहे. कमीत कमी वेळेत व्यक्तीला पोहचवण्याचा प्रयत्न मॅपच्या माध्यमातून केला जाणार आहे.(Bitcoin Cryptocurrency च्या माध्मयातून आता टेस्लाच्या गाड्या विकत घेता येणार, Elon Musk यांची घोषणा)

येणाऱ्या काही महिन्यांमध्ये गुगल मॅपच्या माध्यमातून युजर्सला विविध वर्गादरम्यानचे टॉगल करण्याऐवजी एकाच ठिकाणी कार, बाईक, सार्वजनिक वाहतूक आणि अन्य ऑप्शन सोबत तुलना करण्यास सोपे जाणार आहे. सध्या गुगल मॅपमध्ये उतार दाखवत नाही. काही वेळेस आपल्याला मोकळा रस्ता दाखवला जातो. परंतु पुढे तो रस्ता व्यवस्थित असेल असे नसते.