Xiaomi घेऊन येणार हाय रेंज मधील इलेक्ट्रिक वाहन, 'या' कंपनीच्या फॅक्ट्रीत तयार केली जाणार
Xiaomi Logo (Photo Credits: Wikimedia Commons)

जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता ऑटोमोबाईल कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये काही टेक कंपन्या सुद्धा सहभागी होऊ पाहत आहेत. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, स्मार्टफोन निर्माती कंपनी Xiaomi सुद्धा त्यांची इलेक्ट्रिक गाडी तयार करण्याच्या तयारीत आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्माण करण्यासाठी शाओमीच्या मदतीसाठी Great Wall कंपनीचे नाव समोर येत आहे. त्यामुळे कंपनी सुद्धा येथील प्लांटमध्ये गाडीची निर्मिती करणार आहे.(Mercedes ने लॉन्च केली आपली सर्वात स्वस्त लग्जरी सेडान, जाणून घ्या किंमतीसह खासियत) 

इलेक्ट्रिक वाहन निर्मिती बद्दल रॉयटर्सच्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, टेक फर्म शाओमीच्या स्टॉक प्राइजमध्ये शुक्रवारी 6.71 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर हा रिपोट समोर आल्यानंतर Great Wall हॉन्ग काँगचे स्टॉक 8 टक्क्यांनी अधिक वाढले गेले आहेत. दरम्यान, शाओमी जगातिल सर्वाधिक मोठी स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांपैकी एक आहे. तर लवकरच शाओमी आणि ग्रेट वॉल कंपनी इलेक्ट्रिक वाहन निर्माण संबंधित मोठी घोषणा करु शकते. खरंतर शाओमीकडे वाहन निर्माण करण्याचा अनुभव नाही आहे, अशातच ग्रेट व़ॉल च्या प्लांटमध्ये याच्या इलेक्ट्रिक वाहने तयार करण्याची माहिती समोर आली आहे.

तर दोन्ही कंपन्या पुढील आठवड्यात एकत्रित येण्याचे जाहीर करु शकते. यामध्ये शाओमी आणि ग्रेट वॉल कंपन्या मिळून वाहन निर्मिती करु शकते. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये जेथे ग्रेट वॉल कंपनीच्या इंजिनिअरिंगचा वापर केला जाणार आहे. तेथेच शाओमीच्या तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर होणार आहे. (2021 Volkswagen T-Roc SUV भारतात लॉन्चिंगसाठी तयार, जाणून घ्या किती असू शकते किंमत)

शाओमीची इलेक्ट्रिक वाहनांचे लॉन्चिंग 2023 मध्ये केली जाऊ शकते. शाओमी स्मार्टफोन मार्केटमध्ये आधीपासूनच एक मोठा ब्रँन्ड असून भारतात याचे स्वस्त स्मार्टफोन अधिक पॉप्युलर आहेत. अशी अपेक्षा केली जात आहे की, शाओमीची इलेक्ट्रिक वाहने सुद्धा कमी किंमतीत लॉन्च केल्या जाऊ शकतात. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृतरित्या माहिती समोर आलेली नाही.