Volkswagen India लवकरच आपली 2021 T-Roc SUV लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. तर कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर 2021 T-Roc ही लिस्ट करण्यात आली आहे. ज्यामुळे अंदाज लावला जाऊ शकतो की, ही एसयुवी लवकरच भारतात लॉन्च केली जाऊ शकते. याची किंमत 21.35 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. तर लवकरच ही एसयुवी विक्रीसाठी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. भारतात ही एसयुवी गेल्या वर्षात मार्च महिन्यात लॉन्च केली जाणार आहे. याची किंमत 19.99 लाख रुपये ठेवली गेली होती. ही एसयुवी CBU च्या रुपात भारतात उतरवला होता.(Dual Airbags Compulsory In All New Cars: येत्या 1 एप्रिलपासून कारच्या पुढील दोन्ही सीट्सवर Airbags असणे अनिवार्य)
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, नवी फॉक्सवॅगन टी-रॉक ची विक्री कम्प्लिटली बिल्ट युनिटच्या रुपात केली जाणार आहे. ऐवढेच नाही तर भारतात या कारचे लिमिटेड स्टॉक सुद्धा उपलब्ध होणार आहे. फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये ग्राहकांना एलईडी हेडलॅम्प, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, लेदर अपहोस्ट्री, रिवर्स पार्किंग कॅमेरा, टच स्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, 17 इंचाचा अलॉय व्हिल्स, की लेस एन्ट्री, पॅनारोमिक सनरुफ, 6 एअरबॅग्स सेटअप, टायर प्रेशर मोनिटरिंग सिस्टिमचा समावेश आहे.(TVS Motor कंपनीने आपली लोकप्रिय बाइक Apache RR 310 च्या किंमतीत पुन्हा केली वाढ, जाणून घ्या नवे दर)
इंजिन आणि पॉवर बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 1.5 लीटरचा TSI पेट्रोल इंजिन दिले गेले आहे. जे 148bhp ची मॅक्सिमम पॉवर आणि 250Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असणार आहे. जर ट्रान्समिशन बद्दल बोलायचे झाल्यास ही एसयुवी सेवेन स्पीड DSG ट्रान्समिशन लैस असणार आहे. या एसयुवीची टक्कर भारतात Jeep Compass, MG Hector आणि Hyundai Tucson सोबत होणार आहे. कंपनीकडून ही माहिती दिली गेली नाही की एसयुवी कधी लॉन्च केली जाईल हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.