Tesla Model 3 (Photo Credits: Tesla)

Now Buy Tesla With Bitcoin Currency: अमेरिकेची इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी टेस्लाचे सीईओ एलन मस्क हे नेहमीच त्यांच्या ट्विटमुळे चर्चेत असतात. नुकत्याच एलन मस्क यांनी बिटकॉनबद्दलच्या एका विधानामुळे चर्चेचा विषय ठरले होते. अशातच आता टेस्लाकडून जगातील सर्वाधिक मोठी इलेक्ट्रॉनिक मुद्रा क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून त्यांच्या इलेक्ट्रिक कार खरेदी करता येणार असल्याची घोषणा केली आहे. म्हणजेच तुम्ही क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून टेस्लाच्या गाड्या खरेदी करु शकता.(Chinese Military ने टेस्लाच्या इलेक्ट्रिक गाड्यांवर घातली बंदी, गाडीत लावण्यात आलेला कॅमेरा धोकादायक असल्याचे दिले कारण)

मस्क यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की, आता तुम्ही बिटकॉइनच्या माध्यमातून टेस्लाच्या गाड्या खरेदी करु शकता. त्याचसोबत बिटकॉनच्या माध्यमातून पैसे भरण्याची सुविधा ही युएसच्या बाहेरील ग्राहकांसाठी सुद्धा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. टेस्ला पैसे भरण्यासाठी फक्त इंटरनल आणि ओपन सोर्स सॉफ्टवेअरचा उपयोग करणार आहे. तर टेस्लाने फेब्रुवारी महिन्यात 1.5 बिलियन डॉलरचे बिटकॉइन खरेदी केले होते.(California: एलोन मस्क यांनी पुन्हा कारखाना सुरु केल्यानंतर Tesla च्या 400 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कोरोन विषाणूची लागण- Report)

Tweet:

युनायटेड स्टेट्स सिक्युरिटज अॅन्ड एक्सचेंज कमिशनसह एका फायलिंग कंपनीमध्ये त्यांनी असे म्हटले की, बिटकॉईन हे अधिकाधिक कॅश रिटर्न अधिक करण्यासाठी खरेदी केले आहेत. मस्क हे त्यांच्या ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून सद्या अधिक वेळा क्रिप्टोकरन्सीला प्रोत्साहन देत असल्याचे दिसून येत आहे.

बिटकॉईनमध्ये टेस्लाने गुंतवणूक केल्यानंतर उबर टेक्नॉलॉजीज इंक आणि ट्विटर इंक सारख्या काही कंपन्यांनी क्रिप्टोकरन्सीवर विचार केला होता. उबरचे मुख्य कार्यकारी अधिकारी दारा खोस्रोशाही यांनी असे म्हटले की, बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार केला होता. पण नंतर तो मागे घेतला. मात्र उबर बिटकॉइन संभाव्य पैसे भरण्याच्या रुपात त्याचा स्विकार करु शकते.