Chinese Military bans Tesla Cars: चीन इलेक्ट्रिक वाहनांसाठी जगातील सर्वाधिक मोठे मार्केट आहे. परंतु सध्या अमेरिका आणि टेस्ला दरम्यान तणाव अधिक वाढत चालला आहे. अशातच आता चीनची आर्मीकडून अमेरिकेची वाहन निर्माता कंपनी टेस्लाच्या गाड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. यामागे टेस्लाच्या कारमध्ये वापरण्यात येणाऱ्या कॅमेऱ्याचे कारण आहे. ज्यामुळे चीनच्या आर्मीच्या डेटाला धोका उद्भवू शकतो.(सिंगल चार्जमध्ये 60 किमीची जबरदस्त रेंज देणार Detel ची इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या किंमतीसह खासियत)
चीनमधील पीपुल्स लिबरेशन आर्मी यांचे असे म्हणणे आहे की, टेस्लाच्या कारमध्ये लावण्यात आलेले कॅमेरा धोक्याचे संकेत आहे. याच कारणामुळे त्याच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. त्यांनी असे म्हटले की, टेस्लाच्या इम कारम कॅम मधीन चीनचा डेटा आणि फोनमध्ये सिंक असलेले नंबर सिल्टवर लक्ष ठेवू शकतात. ही गोष्ट चीन सरकारच्या नियंत्रणात नाही आहे. त्यामुळे हे चीनच्या आर्मीसाठी हे एक आव्हान ठरु शकते.
तर टेस्लाच्या नव्या कारमध्ये कॅमेरा दिला जात आहे. जे वाहन मालकांना पार्किंग, ऑटोपायलट आणि सेल्फ ड्राइव्हिंगच्या क्षमतांचा उपयोग करण्यास मदत करणार आहे. या व्यतिरिक्त Sentry Mode वर जगभरात विक्री केल्या जाणाऱ्या काही टेस्ल ईवीएसमध्ये दिसणारे एक फिचर आहे. जे वाहन मालकांना ते तपासण्याची परवानगी देते की जेव्हा ते कारच्या आसपास नसतात.(Hero Xpulse 200T चे BS6 व्हर्जन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि याची खास वैशिष्ट्ये)
काही दिवसांपूर्वी टेस्लाने चीन मध्ये स्थित असलेल्या आपल्या प्रोडक्शन साइटवर हँकिंग संबंधित एक विधान केले होते. याच दरम्यान त्यांनी असे म्हटले की, हँकिंगची घटना फक्त हेनान प्रांतात असलेल्या उत्पादन स्थळापर्यंत मर्यादित आहे. याचा शंघाई कार शोरुमवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. टेस्ला मॉडेल 3 कंपनीची एक लोकप्रिय मॉडेल आहे. त्याचसोबत ही टेस्लाची सर्वाधिक स्वस्त ईवी मधील एक आहे.