Hero Xpulse 200T चे BS6 व्हर्जन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि याची खास वैशिष्ट्ये
Hero Xpulse 200T BS6 Bike (Photo Credits: HeroMotoCorp)

भारतातील लोकप्रिय आणि मोठी दुचाकी कंपनी हिरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorps) नुकतीच भारतात आपली नवी बाईक लाँच केली आहे. Hero Xpulse 200T BS6 व्हर्जन या कंपनीने भारतात लाँच केले आहे. या बाईकमध्ये खूपच शानदार फिचर्स देण्यात आले आहे. दिल्लीत या मॉडेलची किंमत 1,12,800 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. ही BS4 चे अपडेटेट मॉडल असल्याने याच्या किंमतीतही वाढ करण्यात आली आहे. Hero Xpulse 200T बाईक Xpulse रेंजचाच पुढचा भाग आहे. हिरोने नवीन 2021 Hero Xpulse 200T तीन कलर ऑप्शन्ससह सादर केली आहे. यामध्ये मॅट शिल्ड गोल्ड, पँथर ब्लॅक आणि स्पोर्ट्स रेड कलर स्कीमचा समावेश आहे.

Hero Xpulse 200T BS6 व्हर्जनविषयी बोलायचे झाले तर, यात 199.6 सीसी, ऑईल-कूल्ड, सिंगल सिलेंडर, इंधन-इंजेक्टेड इंजिन देण्यात आले आहे. त्याचबरोबर यात एलईडी हेडलाइट आणि टर्न बाय टर्न नेव्हिगेशनसह ब्लूटूथ-कनेक्टेड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सारख्या वैशिष्ट्यांसह सादर करण्यात आली आहे.हेदेखील वाचा- BS6 इंजिनसह Hero Maestro Edge 110 लॉन्च, जाणून घ्या किंमत

या बाईकच्या अपडेटेड व्हर्जनमध्ये 5-स्पीड गिअरबॉक्ससह येणारे हे इंजिन 18.1bhp 8,500 आरपीएम पॉवर आणि 6,500 आरपीएम वर 16.15Nm टॉर्क जनरेत करतं. नवीन अपडेटेड बाइकचे मेकॅनिकल स्पेसिफिकेशन्स बदलले आहेत. परंतु स्टाईल आणि लुक या आधीच्या बीएस 4 व्हर्जनप्रमाणेच आहे.

बाईकच्या सस्पेन्शनबद्दल बोलायचे झाले तर, ामध्ये पुढच्या बाजूला पारंपारिक टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस सात-स्टेप अॅडजस्टेबल रियर मोनो शॉक दिले आहेत. दोन्ही चाकांवर ब्रेकसाठी डिस्क ब्रेक उपलब्ध आहेत. मोटारसायकलमध्ये 276 मिमी अपफ्रंट आणि 220 मिमी रियर डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.

मोटरसायकलचा ग्राउंड क्लीयरन्स 177 मिमी इतका आहे आणि इंधन टाकीची क्षमता 13 लीटर इतकी आहे. 2021 Hero Xpulse 200T मध्ये फुल एलईडी हेडलाइट्स, एलईडी टेल लॅम्प, 17-इंच ब्लॅक अ‍ॅलोय व्हील्स, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन देण्यात आले आहेत.