![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/08/Coronavirus17-380x214.jpg)
एलोन मस्कच्या (Elon Musk) मालकीच्या कॅलिफोर्नियामधील (California) टेस्ला (Tesla) फॅक्टरीत डिसेंबर 2020 पर्यंत , 450 कर्मचार्यांना कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झाली आहे. ही आकडेवारी मे 2020 ते डिसेंबर 2020 या दरम्यानची आहे. नंतर सार्वजनिक आरोग्य आदेशाचा भंग करून हा कारखाना पुन्हा सुरू झाला. वेबसाइट प्लेनसाइटच्या आकडेवारीनुसार, अलमेडा काउंटी डिपार्टमेंट ऑफ पब्लिक हेल्थ यांना कॅलिफोर्निया फ्रिमोंट येथे मे ते डिसेंबर दरम्यान ही कोरोनाची प्रकरणे आढळली. राज्यात कोरोना संसर्गामुळे अनेक निर्बंध असतानाही मार्च आणि एप्रिलमध्ये हा कारखाना कार्यरत होता.
अलमेडा काउंटीतील सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी कोविड-19 प्रकरणे वाढत असल्याने, सॅन फ्रान्सिस्को सहा-काउन्टी ऑर्डर अंतर्गत 23 मार्च रोजी टेस्लाचा प्लांट बंद केला. मात्र काही दिवसांनंतर ही कंपनी पुन्हा सुरु झाली हे सार्वजनिक आरोग्याच्या आदेशाचे उल्लंघन होते. तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थानिक अधिकाऱ्यांशी सुरु असलेल्या लढाईमध्ये मस्क यांना पाठींबा दर्शविला होता.
एनवायटीने दिलेल्या वृत्तानुसार, देशभरातील ऑटोमेकर्सनी मागील वर्षी मार्चच्या मध्यापासून ते मे मध्य पर्यंत दोन महिन्यांसाठी उत्पादन थांबविले होते व आपले कारखाने बंद ठेवले होते. उत्पादन पुन्हा सुरू केल्यावर कामगारांना कोरोना विषाणूची लागण झाली असता, कर्मचार्यांमध्ये पुढील संसर्ग रोखण्यासाठी आणि कामाच्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी पुन्हा उत्पादन थांबविले गेले.
मस्कने कर्मचार्यांना 30 टक्के कार्यक्षमतेसह टेस्ला फ्रेमोंट फॅक्टरीत काम करण्यासाठी पुन्हा बोलावले होते. त्यानंतर शटडाउनच्या आदेशावरून टेस्लाने 9 मे रोजी अलमेडा काउंटीविरोधात दावा दाखल केला, परंतु दोन आठवड्यांनंतर हा खटला मागे घेण्यात आला. आकडेवारीनुसार टेस्ला प्लांटमध्ये दहा हजार लोक काम करत होते त्यातील 440 लोकांना कोरोनाची लागण झाली होती.