Coronavirus Update: कोरोनाग्रस्ताच्या संख्येत भारताला मागे टाकत ब्राझील जगात दुसऱ्या स्थानावर; इटलीमध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा इशारा
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: IANS)

Coronavirus Update: ब्राझील कोरोना रुग्णांच्या संख्येच्या (Brazil Corona Patients) बाबतीत जगातील दुसर्‍या स्थानावर पोहोचला. शुक्रवारी, लॅटिन अमेरिकन देशात 85,663 नवीन रुग्ण आढळले. ब्राझीलमधील एकूण रुग्णांची संख्या वाढून 1,13,63,389 झाली आहे. ब्राझीलमध्ये मृतांचा आकडा 2,75,105 वर पोहचला आहे. यापूर्वी कोरोना रुग्ण संख्येच्या बाबतील भारत जगात दुसर्‍या क्रमांकावर होता. सध्या देशात कोरोनाचे एकूण 1,13,08,846 प्रकरणे आहेत. अमेरिकेत अजूनही 2.93 कोटी कोरोना प्रकरणांसह प्रथम क्रमांकावर आहे.

इटली मध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा इशारा -

पंतप्रधान मारिओ द्रागी यांनी कोरोना विषाणूच्या नव्या लाटेचा इशारा देत असे सांगितले की, इटलीच्या बर्‍याच भागातील दुकाने, रेस्टॉरंट्स आणि शाळा सोमवारी बंद राहतील. तसेच 3 ते 5 एप्रिल रोजी ईस्टरच्या दृष्टीने संपूर्ण लॉकडाउन करण्यात येईल. (वाचा - WHO च्या मते AstraZeneca COVID-19 vaccine सुरक्षित; रक्तांच्या गुठळ्या होण्याच्या भीतीने काही देशांनी थांवबले लसीकरण)

जगात कोरोना संक्रमणाची संख्या 11.97 कोटीहून अधिक झाली आहे. तसेच आतापर्यंत 26.53 लाख लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. दरम्यान, जगातील सर्वात जास्त कोरोना ग्रस्त असलेला अमेरिका वर्षाच्या अखेरीस आवश्यकतेपेक्षा जास्त लस खरेदी करण्याची योजना आखत आहे. जॉनसन आणि जॉन्सनच्या लसांचे 10 कोटी डोस खरेदी करण्याच्या सूचना अध्यक्ष जो बायडन यांनी दिल्या आहेत.

लस खरेदीच्या या आदेशापूर्वी अमेरिकेकडे मेच्या मध्यापर्यंत प्रत्येक प्रौढ व्यक्तीला लस देण्यासाठी डोस उपलब्ध असेल. त्याचप्रमाणे जुलै अखेरीस या देशात 40 कोटी लोकांना डोस उपलब्ध होईल.

अमेरिकेत 20 कोटीहून अधिक लोकांना कोविड लसीचा डोस देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जॉनसन आणि जॉन्सनची नवीन लस जूननंतर प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे. ज्याद्वारे अतिरिक्त 10 कोटी लोकांना लस दिली जाऊ शकते. आम्हाला पूर्णपणे तयार राहायचं आहे, असं व्हाइट हाऊसचे प्रेस सचिव जेन साकी यांनी सांगितलं आहे.