Chinese President XI Jinping (PC - Facebook)

Chinese President XI Jinping: शी जिनपिंग (XI Jinping) हे पुन्हा एकदा सलग तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. शी यांनी अध्यक्ष म्हणून पाच वर्षांची अभूतपूर्व तिसरी टर्म मिळवली आहे. तथापि, शी जिनपिंग यांच्या विरोधात कोणताही उमेदवार नसल्याने ही केवळ औपचारिक घोषणा होती. माओ झेडोंग नंतर देशातील सर्वात शक्तिशाली नेता म्हणून त्यांनी आपली पकड मजबूत केली आहे.

चीनच्या रबर-स्टॅम्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संसदेच्या जवळपास 3,000 सदस्यांनी, नॅशनल पीपल्स काँग्रेस (NPC) ने एकमताने 69 वर्षीय शी यांना ग्रेट हॉल ऑफ द पीपल येथे अध्यक्ष म्हणून मतदान केले. ज्यामध्ये इतर कोणतेही उमेदवार नव्हते. (हेही वाचा -Nepal Presidential Election: नेपाळमध्ये राष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक, Ramchandra Paudelआणि Subas Chandra Nembang यांच्यात थेट सामना)

शी यांच्या बाजूने मतदान सुमारे एक तास चालले आणि सुमारे 15 मिनिटांत इलेक्ट्रॉनिक मतमोजणी पूर्ण झाली. देशाच्या केंद्रीय लष्करी आयोगाच्या अध्यक्षपदी तिसर्‍यांदा निवडून शी यांची एकमताने निवड करण्यात आली. संसदेने झाओ लेजी यांची नवीन संसद अध्यक्ष म्हणून आणि हान झेंग यांची नवीन उपाध्यक्ष म्हणून निवड केली.

शी जिनपिंग तिसर्‍यांदा राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्याने चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचा चार दशके जुना नियम मोडीत निघाला. 1982 पासून राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ 10 वर्षांचा होता. शी यांना तिसरी टर्म दिल्याने हा नियम मोडला गेला आहे. पुढील दोन दिवसांत, शी यांनी मंजूर केलेल्या अधिकार्‍यांची मंत्रिमंडळातील उच्च पदांवर निवड केली जाणार आहे.