Panda | X

हॉंगकॉंग मध्ये एका Giant Panda ने जुळ्यांना जन्म दिला आहे. ही पिल्लांना जन्म देणारी सर्वात जास्त वयाची पांडा माता ठरली आहे. Ying Ying,पांडाने एका स्त्री आणि एका पुरूष जातीच्या पिल्लाला जन्म दिला आहे. Ocean Park मधील या पिल्लांच्या आगमनाने सारेच सुखावले आहेत. Ocean Park पार्क मध्ये ही पांडा साथीदार Le Le सोबत 2007 पासून राहत आहे. माता Ying Ying च्या 19 व्या बर्थ डे च्या पूर्वसंध्येला तिने दोन्ही पिल्लांना जन्म दिला आहे. Ying Ying हे वय मानवी वयानुसार 57 वर्ष आहे.

Ocean Park Corporation कडून जारी स्टेंटमेंट मध्ये त्यांनी पार्क मध्ये आनंदाचं वातावरण म्हटलं आहे. Ying Ying पिल्लांना पहिल्याच प्रयत्नामध्ये जन्म देणारी पांडा ठरलेल्याचा आनंद होत असल्याचं म्हणाली आहे. स्त्री जातीच्या पिल्लाचं वजन 122 ग्रॅम आहे तर तिच्या पाठोपाठ आलेल्या पुरूष जातीच्या पिल्लाचं वजन 112 ग्रॅम आहे. पार्कने दिलेल्या माहितीनुसार, सध्या दोन्ही पिल्लं 23 तास इंटेंसिव्ह केअर मध्ये आहेत. पुढील काही महिने ती लोकांसमोर ठेवली जाणार नाहीत. सध्या ती अत्यंत नाजूक स्थितीमध्ये आहेत. त्यांना स्थिरस्थावर होण्यासाठी वेळ लागेल. Panda Viral Video: पांडाचा बर्फात खेळतानाचा मोहक व्हिडीओ व्हायरल, पाहा.

स्त्री जातीच्या पिल्लाचं शरीराचं तापमान कमी आहे. रडणं कमी आहे आणि अन्न देखील कमी घेतलं जात आहे. Giant pandas मध्ये पुनरूत्पादन क्षमता कमी असते. जितकं वय जास्त तितकी त्याची शक्यता अजूनच कमी होते. तसेच त्यांची गरोदर असण्याची देखील लगेच माहिती मिळत नाही. panda breeding programs ला यश मिळत आहे. त्यांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे.

Ocean Park च्या माहितीनुसार, Ying Ying ने गरोदर असल्याची लक्षणं दाखवली होती. यामध्ये भूक मंदावणं, लोळत पडणं, हार्मोनल लेव्हल मध्ये बदल यांचा समावेश आहे. पांडांची गर्भधारणा नैसर्गिकरित्या झाली होती.