ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा Donald Trump होणार अमेरिकेचे राष्ट्रपती? नव्या दाव्यामुळे वाढली होमलँड सिक्युरिटी विभागाची चिंता
Donald Trump | (Photo Credits: Facebook)

नुकतीच झालेली अमेरिकेची राष्ट्रपती पदाची निवडणूक अनेक कारणांनी गाजली. शेवटपर्यंत डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) हेच अमेरिकेचे नवे राष्ट्रपती होतील अशी चर्चा होती, मात्र मतमोजणीनंतर डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जो बिडेन (Joe Biden) यांची अध्यक्षपदी निवड झाली. बिडेन यांनी पदाचा कारभार सांभाळण्यास सुरुवात करून काही महिनेच लोटले असता, आता चर्चा आहे की ऑगस्ट महिन्यात रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा राष्ट्रपती होऊ शकतात. संपूर्ण अमेरिकेमध्ये अशी अफवा पसरली आहे. या अफवामुळे होमलँड सिक्युरिटी विभागात चिंता निर्माण झाली आहे.

अनेक रिपोर्ट्समध्ये सांगितले आहे की, ऑगस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा एकदा अध्यक्षपद बहाल केले जाऊ शकते. ट्रंप यांच्या पुन्हा नियुक्तीच्या विचित्र सूचनेनंतर असा कथित कट रचल्यामुळे देशात खळबळ उडाली आहे. सिडनी पॉवेलसह माजी राष्ट्रपतींच्या जवळच्या लोकांनी ही कल्पना उचलून धरली आहे. सिडनी पॉवेल, एटर्नी ज्यांच्यावर या दाव्यांवरून खटला भरला जात आहे.

त्यांनी दावा केला आहे की, कम्युनिस्ट नेत्यांनी व्हेनेझुएलामधील मशीनचे ऑपरेटर यांनी कट रचल्यामुळे ट्रम्प यांची निवडणुकीत फसवणूक करण्यात आली.  या कथित फसवणुकीत सामील असलेले, मायपिलोचे मुख्य कार्यकारी अधिकारी माईक लिंडेल यांनाही 2020 मताबद्दल अनेक दाव्यांसाठी कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागत आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टर मॅगी हॅबर्मन यांच्या म्हणण्यानुसार ऑगस्टमध्ये पुन्हा आपली नियुक्ती होईल असा विश्वास खुद्द ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. त्यांनीही हीच गोष्ट इतरांकडून जाहीरपणे ऐकली आहे. (हेही वाचा: जो बिडेन यांचा मुलगा Hunter Biden ने बोलावली रशियन कॉलगर्ल; पित्याच्या खात्यातून केले 18 लाखांचे पेमेंट- रिपोर्टमधून खुलासा)

मात्र यामागचे कारण व ते नक्की कसे होईल हे स्पष्ट झाले नाही. आउटलेटच्या म्हणण्यानुसार, काउंटर इंटेलिजेंस अधिकारी जॉन कोहेन यांना कॉंग्रेसच्या सदस्यांनी एका खासगी संभाषणादरम्यान ऑगस्टबाबतच्या सिद्धांताबद्दल विचारणा केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, या भविष्यवाणीबाबत गंभीर चिंता आहे. कारण ट्रम्प यांची निवडणूकीत फसवणूक झाल्याची अफवा पसरवली जात आहे. म्हणूनच त्यांच्या समर्थकांकडून आणखी हिंसक प्रतिक्रियेची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र त्यांच्याकडे याबाबत काही ठोस माहिती नसल्याचेही समोर आले आहे.