अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन (Joe Biden) यांचा मुलगा हंटर बिडेन (Hunter Biden) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हंटर बिडेन याने केलेल्या एका चुकीमुळे आता अमेरिकेचे अध्यक्ष आणि त्यांचे वडील जो बिडेन संकटात सापडले आहेत. अलीकडेच काही परदेशी माध्यमांच्या वृत्तात असे समोर आले आहे की, जो बिडेन यांचा मुलगा हंटर बिडेनने त्याचे वडील जो बिडेन यांच्या बँक खात्यातून 25 हजार डॉलर्स म्हणजेच जवळजवळ 18 लाख रुपये एका रशियन कॉलगर्लला दिले आहेत. न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालात म्हटले आहे की, मे 2018 मध्ये हंटर बिडेन यांनी रशियाच्या Emerald Fantasy Girls एजन्सीकडून एका कॉलगर्लला सेवेसाठी बोलावले होते.
त्यावेळी हंटरने या मुलीला Chateau Marmont नावाच्या हॉटेलवर बोलावले होते. या ठिकाणी दोघांमध्ये शारीरिक सबंध आले. काही दिवस हे दोघे एकत्र होते. या कॉल गर्लचे पैसे हंटरने त्याचे वडील जो बिडेन यांच्या खात्यातून दिले. हे संपूर्ण प्रकरण हंटर बिडेनच्या लॅपटॉपवरूनच समोर आले आहे. हंटर बिडेनच्या लॅपटॉपमध्ये या कॉलगर्लसोबतचे सर्व संदेश, फोटो सेव्ह केले आहेत. हंटरचा लॅपटॉप एखाद्या डायरीप्रमाणे आहे, ज्यामध्ये त्याचे ईमेल, ,एसेजेस, संभाषणे, आर्थिक नोंदी वगैरे आहेत. (हेही वाचा: काय सांगता? जेफ बेजोस यांची पूर्वाश्रमीची पत्नी MacKenzie Scott यांनी केले 19,800 कोटींचे दान; 286 संघटनांना मिळाली मदत)
डेलवेअर रिपेयर शॉपमध्ये हंटर आपला लॅपटॉप विसरला होता आणि अशा प्रकारे ते अमेरिकन तपास यंत्रणा एफबीआयच्या ताब्यात गेला आणि त्यानंतर इतका मोठा खुलासा झाला. या लॅपटॉपमधून हेही समोर आले आहे की, हंटर बिडेनने या कॉलगर्लला अनेकदा पैसे ऑनलाईन हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. मात्र लॅपटॉपमधील रिसीट्स हे दर्शवतात की, हे अयशस्वी झालेले व्यवहार प्रत्यक्षात पूर्ण झाले होते. अशाप्रकारे हंटर बिडेनने चुकून या कॉलगर्लला 1 तासात 18 लाख पाठवले होते.