New Year Celebration (Photo Credit : Twitter)

Happy New Year Celebration 2023: 2022 या वर्षाचा निरोप घेण्यासाठी जगभर जय्यत तयारी सुरू आहे. यासोबतच आपण सर्वजण नवीन वर्ष 2023 चे स्वागत करण्यासाठी नव्या उमेदने सज्ज आहोत. पण तुम्हाला माहित आहे का की, आपण जेव्हा 31 डिसेंबर रोजी रात्री 12 वा. नवीन वर्ष साजरे करत असतो, नाचत असतो आणि एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असतो तोपर्यंत अनेक देशांमध्ये नवीन वर्ष साजरे केले जाते. येथे आपण कोणत्या देशातील लोक नवीन वर्ष प्रथम साजरे करतात आणि कोणत्या देशातील लोकांना नवीन वर्ष साजरे करण्याची संधी सर्वात शेवटी मिळते. यासंदर्भात जाणून घेऊयात.

येथे साजरे केले जाते सर्वांत अगोदर नवीन वर्ष -

नवीन वर्ष साजरे करणारा या पृथ्वीवरील पहिला देश दक्षिण पॅसिफिक महासागरातील बेट समूहावरील टोंगा हा देश आहे. टोंगा भारतापेक्षा 7 तास 30 मिनिटे पुढे धावतो. म्हणजेच, 31 डिसेंबर रोजी, जेव्हा भारतात दुपारी 4:30 वाजले असतील, त्याच वेळी टोंगामध्ये म्हणजेच 01 जानेवारी 2023 रोजी नवीन वर्ष सुरू झालेले असेल. होय, हा जगातील पहिला देश आहे, जिथे नवीन वर्ष प्रथम साजरे केले जाते. यानंतर सिडनीचा (ऑस्ट्रेलिया) क्रमांक लागतो. (हेही वाचा - New Year Eve 2023 HD Images: नवीन वर्षाचे HD Images पाठवून नातेवाईकांना द्या खास शुभेच्छा, पाहा हटके शुभेच्छा संदेश)

सर्वात शेवटी येथे साजरे केले जाते नवीन वर्ष -

युनायटेड स्टेट्सपासून जवळच असलेल्या हॉलँड आणि बेकर बेटांचे निर्जन बेट, अगदी शेवटी नवीन वर्षाचे स्वागत करते. येथील लोक नवीन वर्षाची सुरुवात 1 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता (जीएमटीनुसार) किंवा संध्याकाळी 05.30 (भारतीय वेळेनुसार) करतात.

या देशांमध्ये GMT नुसार, यावेळी 31 डिसेंबर (2022) रोजी नवीन वर्ष साजरे केले जाईल -

न्यूझीलंड: सकाळी 10.15

ऑस्ट्रेलिया (बहुतेक प्रदेश): दुपारी 01.00

जपान, दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया - दुपारी 03.00

चीन, फिलीपिन्स आणि सिंगापूर: संध्याकाळी 04.00

बांगलादेश: संध्याकाळी 06.00

नेपाळ: संध्याकाळी 6:15

भारत आणि श्रीलंका: संध्याकाळी 06:30

पाकिस्तान: संध्याकाळी 07.00

जर्मनी, फ्रान्स, इटली, बेल्जियम आणि स्पेन: रात्री 11.00

यूके, आयर्लंड, आइसलँड, पोर्तुगाल: सकाळी 00.00

आज सर्वजण नवीन वर्ष साजरे करण्यासाठी तयारी करत आहेत. आज संध्याकाळी 12 वाजताच्या सुमारास मोठ्या उत्साहात नववर्षाचे स्वागत केले जाईल.