कोरोना व्हायरस (Coronavirus) या साथीच्या आजाराने जवळजवळ सर्व देशांत शिरकाव करून, मानव जातीसमोर एक मोठे संकट उभे केले आहे. या विषाणूमुळे लोकांच्या जीवनावर फार मोठा परिणाम झाला आहे. विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने आर्थिक, सामाजिक हालचाली ठप्प झाल्या आहेत. यामुळे अनेक देश जवळजवळ थांबले आहेत. मात्र आज, सोमवारपर्यंत अद्याप असे काही देश आहेत जिथे कोरोना व्हायरसचे एकही प्रकरण आढळलेले नाही. चीनच्या वुहानपासून उद्भवलेल्या या विषाणूची लागण 185 देशांमध्ये/प्रदेशात झाली आहे. तर आज आम्ही असे काही देश सांगत आहोत जिथे अजूनही कोरोनाचा शिरकाव झाला नाही.
या देशांत कोरोनाचा एकही रुग्ण नाही -
किरीबाती (Kiribati)
कोमोरोस (Comoros)
मार्शल बेटे (Marshall Islands)
लेसोथो (Lesotho)
मायक्रोनेशिया ( Micronesia)
उत्तर कोरिया (North Korea)
पलाऊ (Palau)
सामोआ (Samoa)
नऊरू (Nauru)
साओ टोमे आणि प्रिन्सिपे (Sao Tome and Principe)
सोलोमन बेटे (Solomon Islands)
टोंगा (Tonga)
तुर्कमेनिस्तान (Turkmenistan)
ताजिकिस्तान (Tajikistan)
तुवालु (Tuvalu)
वानुआतु (Vanuatu)
(हेही वाचा: Coronavirus: अमेरिकेत मृत्यूचे तांडव सुरुच! गेल्या 24 तासांत 1,330 कोरोना बाधित रुग्ण दगावले)
दरम्यान, जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी (Johns Hopkins University) कोरोना व्हायरस ट्रॅकरच्या मते, 2,970,000 हून अधिक लोकांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे आणि जागतिक मृत्यूची संख्या 206,500 पेक्षा जास्त आहे. या संसर्गातून 865,900 हून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.
भारतात 23 मार्च पासून लोक घरात आहेत व सध्या तरी हा लॉक डाऊन 3 मे पर्यंत चालेल असे सांगितले गेले आहे. मात्र देशात बाधितांची संख्या पाहता हा लॉक डाऊन वाढण्याची शक्यता आहे. अशात केंद्र सरकारने शुक्रवारी दावा केला आहे की, भारतातील लॉक डाऊन 16 मे राहिल्यास देशात कोरोना व्हायरसचे कोणतेही नवीन प्रकरण आढळणार नाही.