जगभरात हाहाकार माजविणा-या कोरोना व्हायरसने (Coronavirus) आतापर्यंत 2 लाखांच्या वर लोकांना भक्ष्य केले आहे. जगभरात कोरोना बाधितांची संख्या 29 लाखांच्या वर पोहोचली असून अमेरिकेत अक्षरश: या विषाणूने थैमान घातले आहेत. AFP ने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या 24 तासांत अमेरिकेत (US) 1,330 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 9 लाखांच्या वर लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ही आकडेवारी खूपच धक्कादायक असून येथील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या देशात आतापर्यंत 55 हजारांच्या वर लोकांना कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. झपाट्याने वाढत जाणारा मृतांचा आकडा पाहता अमेरिकेत कोरोना महामारीची समस्या आणखीनच गंभीर बनत चालली असल्याचे दिसत आहे.
अमेरिके पाठोपाठ स्पेनमध्ये कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,26,629 इतकी झाली आहे. तर इटलीमध्ये हीच संख्या 1,97,675 इतकी झाली आहे. ही आकडेवारी डोळे चक्रावणारी असून या परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. अमेरिकेत गेल्या 24 तासांत COVID-19 चे 2,494 रुग्णांचा मृत्यू, मृतांची एकूण संख्या 53,511
दुसरीकडे भारतात कोरोना बाधितांची एकूण संख्या 26,917 इतकी झाली असून 826 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तसेच 5914 रुग्ण बरे झाल्याचे देखील सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra_ या आजाराची लागण होणाऱ्यांची संख्या 8 हजारांच्या जवळ पोहचली आहे. रविवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 440 नवीन रुग्ण आढळले आणि या दरम्यान 19 लोकांचा मृत्यू झाला. यापैकी 358 प्रकरणे तर 12 जणांचा मृत्यू फक्त मुंबईतील आहेत. मुंबईत कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण 5049 वर पोहोचले आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे आतापर्यंत 323 लोकांचा मृत्यू झाला असून राज्यात संसर्ग झालेल्यांची संख्या 7628 वर पोहोचली आहे.