अमेरिकेत गेल्या 24 तासांत COVID-19 चे 2,494 रुग्णांचा मृत्यू, मृतांची एकूण संख्या 53,511
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोविड-19 (COVID-19) सारख्या विषाणूने जगभरात हैदोस घातला असून अमेरिकेत (US) अक्षरश: मृत्यूचे तांडव सुरु केले आहेत. गेल्या 24 तासांत अमेरिकेत 2,494 रुग्णांचा मृत्यू झाला असून हा मृतांचा एकूण आकडा 53,511 वर पोहोचला आहे. तर या देशात 9,36,293 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने ही माहिती दिली आहे. ही संख्या खूपच धक्कादायक असून अमेरिकेत चिंतेचे वातावरण पसरले आहे. जगभरात कोरोना बाधितांची एकूण संख्या 29,21, 201 इतकी झाली आहे.

अमेरिकेत कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येबरोबर मृतांचा आकडाही झपाट्याने वाढत चालला आहे. तर स्पेनमध्ये कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,23, 759 इतकी झाली आहे.  अमेरिकेत गेल्या 24 तासांत 1,258 कोरोना बाधितांचा मृत्यू; मृतांची एकूण संख्या 51,017 वर

भारतात कोरोना बाधितांची संख्या 26, 496 इतकी झाली आहे. यात 5804 रुग्ण बरे झाले असून 824 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे.

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लसींपैकी पहिली लस चाचणीमध्ये अपयशी ठरली आहे. गिलियड (Gilead) ची ही लस क्लिनिकल ट्रायल दरम्यान कोरोना व्हायरसला हरवण्यात अपयशी ठरली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) 'चुकून' प्रसिद्ध केलेल्या अहवालात हे उघड झाले आहे.