Corona New Variant: कोरोनाचा नवीन व्हरियंट कधी येणार? WHO ने सांगितलं, पुढील व्हायरस वेगाने पसरणार
(Photo Credit - Pixabay)

Corona New Variant: कोरोना व्हायरसमुळे दोन वर्षांत संपूर्ण जग बदलून गेले आहे. प्रत्येक वेळी जेव्हा कोरोनाची लाट कमकुवत होते. तेव्हा लोकांना ही महामारी संपेल अशी अपेक्षा असते. परंतु, तोपर्यंत कोरोनाचा नवीन प्रकार समोर येतो. Omicron हा कोरोनाचाचं एक प्रकार होता. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे की, कोरोनाचा हा प्रकार शेवटचा नाही. नवीन प्रकार कधी येईल याबद्दल डब्ल्यूएचओने शक्यता वर्तवली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, व्हेरियंट कधीही येतात, पण पुढील व्हेरियंट यायला वेळ लागेल. डॉ. मारिया व्हॅन कारखॉफ यांनी सांगितले की, ओमिक्रॉन हा चिंतेचे कारण बनलेले शेवटचा प्रकार नव्हता, यूएन आरोग्य संस्था चार वेगवेगळ्या आवृत्त्यांचा मागोवा घेत आहे.

म्यूटेशन ट्रॅक करण्याचं काम सुरू -

डॉक्टर मारिया यांनी कोविडच्या पुढील प्रकाराबद्दल सांगितले, आम्हाला या विषाणूबद्दल बरेच काही माहित आहे. परंतु, आम्हाला सर्व काही माहित नाही. खरे सांगायचे तर, हे रूपे वाइल्ड कार्ड्ससारखे आहेत. म्हणून हा विषाणू बदलत आहे. आम्ही त्याचा मागोवा घेत आहोत. (वाचा - Zika Virus: केरळमध्ये झाला होता 'झिका व्हायरस'चा कम्युनिटी स्प्रेड, अभ्यासात मोठा खुलासा)

पसरण्याचा वेग अधिक वेगवान होणार -

लाइव्हमिंटच्या अहवालानुसार, डॉ. मारिया यांनी सांगितले की, ओमिक्रॉन हे चिंतेचे नवीनतम प्रकार आहे. ते शेवटचे नसेल. आशा आहे की पुढील प्रकार येण्यास थोडा वेळ लागेल. मात्र, आता जी रूपे येतील, त्यांच्या प्रसाराचा वेग अतिशय वेगवान असेल. म्हणूनच आपण लसीकरणाचा वेग आणि त्याचा प्रसारही कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

यापेक्षा धोकादायक काय असेल?

डॉ मारिया यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की, पुढील प्रकार ओमिक्रॉनपेक्षा वेगवान असेल. परंतु, ते तितके धोकादायक असेल की, नाही याचे उत्तर अद्याप दिलेले नाही. ओमिक्रॉनचे प्रकार आत्तापर्यंत बहुतांश देशांमध्ये आढळून आले आहेत. अनेक देशांमध्ये त्याचा संसर्ग होण्याचे प्रमाण कमी होत आहे.