Zika Virus: केरळमध्ये झाला होता 'झिका व्हायरस'चा कम्युनिटी स्प्रेड, अभ्यासात मोठा खुलासा
झिका व्हायरस (संग्रहित संपादित प्रतिमा)

Zika Virus Community Spread: इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) च्या अहवालात झिका व्हायरसबाबत धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. केरळमध्ये झिका विषाणूचा कम्युनिटी स्प्रेड झाल्याचे या अभ्यासातून दिसून आले आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये केरळमध्ये झिकाचा पहिला रुग्ण आढळून आला होता.

अहवालात असे म्हटले आहे की, केरळमध्ये गेल्या वर्षी झिका विषाणूच्या प्रकरणांचा ट्रॅव्हल हिस्ट्री नव्हती, ही प्रकरणे समुदायाच्या प्रसाराशी संबंधित आहेत. "गेल्या एका महिन्यात झिका प्रकरणांची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नव्हती," असे अहवालात म्हटले आहे. त्याच्या कुटुंबातील सदस्यांनाही अशी लक्षणे आढळली नाहीत. असे म्हटलं जातं आहे की, झिका विषाणूचा कम्युनिटी स्प्रेड झाला होता. या अभ्यासात देशाच्या इतर भागांमध्ये झिकाचे निरीक्षण करण्याची सूचनाही करण्यात आली आहे. (वाचा - COVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत 58,077 नवे कोरोना रूग्ण; 657 मृत्यू)

विशेष म्हणजे, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान केरळमध्ये झिकाचा एक रुग्ण आढळून आला होता. उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्येही झिकाची प्रकरणे नोंदवली गेली.

झिका व्हायरसची लक्षणे -

झिका व्हायरसची लक्षणे डेंग्यूसारखीच असतात. यामध्ये ताप, त्वचेवर लाल पुरळ, सांधेदुखी आणि लाल डोळे यांचा समावेश होतो. झिका विषाणूची लागण झालेली व्यक्ती 7 ते 8 दिवस प्रभावित राहते. हा विषाणू मुख्यतः गर्भवती महिलांना प्रभावित करतो. यामुळे जन्माला येणारे मूल हा अविकसित मेंदू घेऊन जन्माला येतो.