Bangladesh: बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी हिंसाचार, 14 मतदान केंद्रे आणि दोन शाळांना आग; पाच जणांना अटक
Bangladesh General Election 2024 (PC - X/@airnewsalerts)

Bangladesh General Election 2024: बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी (Bangladesh General Election) हिंसाचाराच्या (Violence) बातम्या आल्या आहेत. ढाका ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी संध्याकाळ आणि शनिवारी पहाटे सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी बांगलादेशातील 10 जिल्ह्यांमध्ये किमान 14 मतदान केंद्रे आणि दोन शाळांना आग लावण्यात आली. मात्र, या हिंसाचारात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

वृत्तानुसार, शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास बदमाशांनी लालमोनिरहाटच्या हातीबंधा उपजिल्हामधील एका मतदान केंद्राला आग लावली. त्यानंतर शनिवारी रात्री 10 वाजता शेख सुंदर मास्टरपारा प्राथमिक शाळा या केंद्राला आग लावली. (हेही वाचा -Bangladesh Election 2024: बांग्लादेशमध्ये निवडणुकीदरम्यान हिंसाचार, ढाका येथे बेनापोल एक्सप्रेस ट्रेनला आग; चौघांचा मृत्यू)

दरम्यान, शनिवारी मैमनसिंगमध्ये एका मतदान केंद्राला आग लागली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत पाच जणांना अटक केली. याआधी, गुरुवारी रात्री ते शुक्रवार सकाळपर्यंत बांगलादेशातील फेनी आणि राजशाहीमध्ये किमान पाच शाळांना आग लावण्यात आली होती, ज्यांचा रविवारी मतदान केंद्र म्हणून वापर केला जाणार होता. येथे आता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (हेही वाचा, Nobel Laureate Muhammad Yunus Sentenced Jail: नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांना बांगलादेश न्यायालयाने सुनावली 6 महिन्यांची शिक्षा; जाणून घ्या काय आहेत आरोप)

अज्ञातांनी दोन मतदान केंद्रांना लावली आग -

हबीगंजमध्ये शनिवारी पहाटे 12.15 च्या सुमारास चुनारुघाट उपजिल्हामधील धलाईपार सरकारी प्राथमिक शाळेच्या केंद्राला काही बदमाशांनी आग लावली. याशिवाय, चुनारुघाट उपजिल्हा निर्बाही अधिकारी नीलिमा रायहाना यांनी सांगितले की, या आगीत निवडणूक साहित्य किंवा उपकरणांचे नुकसान झाले नाही. बांगलादेशातील गाझीपूर जिल्ह्यात शनिवारी जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात दोन मतदान केंद्रांना अज्ञातांनी आग लावली.

दरम्यान, रविवारी सुमारे 800,000 पोलीस, निमलष्करी दल आणि पोलीस सहाय्यक मतदान केंद्रांवर पहारा देतील. शांतता राखण्यासाठी लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे अधिकारीही देशभरात तैनात करण्यात आले आहेत. शुक्रवारी रात्री एका वेगळ्या घटनेत, एका पॅसेंजर ट्रेनवर झालेल्या संशयास्पद जाळपोळीत एका लहान मुलासह चार जणांचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. ढाकाहून जाणाऱ्या बेनापोल एक्स्प्रेसच्या चार डब्यांना शुक्रवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याने आठ जण जखमी झाले.