Velentine Day च्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या मेडिकल कॉलेजचे अजीब फरमान, मुलींनी हिजाब तर मुलांनी टोपी घालण्याचे निर्देशन
Image used for representational purpose only (Photo Credits: PTI)

भारतात सुरु असलेल्या हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील एका मेडिकल कॉलेजने एक विचित्र फरमान काढले आहे. त्यानुसार पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथील एका मेडिकल कॉलेजने आपल्या विद्यार्थ्यांना व्हेलेंटाइन डे पाहता मुलींनी हिजाब तर मुलांनी सफेद टोपी घालून येण्याचे निर्देशन दिले आहेत. त्याचसोबत मुलांना मुलींपासून दोन मीटर दूर राहण्यास ही सांगण्यात आले आहे.(Pakistan: पंजाबमध्ये 'इज्जतीच्या नावाखाली' 6 महिन्यात 2400 महिलांची अब्रु लुटली, 90 जणांची हत्या)

टाइम्स वृत्तपत्राने शुक्रवारी आपल्या रिपोर्टमध्ये असे म्हटले की, इस्लामाबाद येथील आंतरराष्ट्रीय मेडिकल कॉलेजने शनिवारी एक सर्कुलर जाहीर केले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना व्हेलेंटाइन डे मध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे.  ऐवढेच नव्हे तर या दिवसासंबंधित काही गोष्टींमध्ये सहभाग घेऊ नये असे ही म्हटले आहे. सर्व विद्यार्थ्यांना योग्य ड्रेस कोड दिला गेला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी हिजाबाने डोके, मान आणि छाती पूर्णपणे झाकावी असे म्हटले आहे. (अमेरिकेतून लंडनकडे जाणाऱ्या फ्लाइटमध्ये बलात्कार, एअपोर्टवर उतरताच पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या)

तसेच मुलांनी सफेद टोपी सुद्धा घालण्याचे सक्तीचे आदेश दिला गेला आहे. सर्कुरलमध्ये असे म्हटले की, गाइडलाइन्सचे उल्लंघन करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी कॉलेज स्टाफ परिसरात गस्त घालणार आहेत. परंतु जर नियमांचे उल्लंघन केल्यास पाच हजार रुपयांचा दंड सुनावला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

रिफा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीशी संलग्न वैद्यकीय शाळांची स्थापना 1996 मध्ये झाली. तर व्हॅलेंटाईन डेला सेंट व्हॅलेंटाईन डे देखील म्हणतात. तो दरवर्षी 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. वर्षानुवर्षे हा जगभरातील कपल्सकडून साजरा केला जातो. पण पाकिस्तानमधील विद्यार्थिनींसाठी अशा ड्रेस कोडच्या सूचना कॉलेजने जारी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. पाकिस्तानातही अशा घटना यापूर्वी समोर आल्या आहेत.