Representational Image (Photo Credits: Pixabay)

Pakistan: पाकिस्तान मधील परिस्थिती अत्यंत भयंकर आहे. अशातच गेल्या 6 महिन्यात परिवाराच्या इज्जतीच्या नावावर 2439 महिलांची अब्रु लुटली तर 90 महिलांची हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही संपूर्ण आकडेवारी पाकिस्तानातील नसून तेथीलच पंजाबचा सुद्धा समावेश आहे. याबद्दलचा खुलासा Punjab Information Commission यांच्याकडून करण्यात आला आहे. यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, पंजाबची राजधानी लाहौर मध्ये जवळजवळ 400 महिलांसोबत गेल्या 6 महिन्यात बलात्कार झाले. तर 2300 हून अधिक महिलांचे अपहरण करण्यात आले. लाहौरची लोकसंख्या 11 कोटींच्या घरात आहे.

गेल्याच आठवड्यात लाहौरहून 200 किमी दूर सरगोधा जिल्ह्यात एका तरुणाने आपल्याच बहिणीची हत्या केली कारण तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. हत्या करण्यात आलेली 28 वर्षीय तरुणी ही 5 मुलांची आई होती. तिच्यावर शेजारच्या चार तरुणांनी बलात्कार केला होता. यामुळे परिवाराच्या अब्रुला नुकसान पोहचू नये म्हणून तिच्याच भावाने तिच्यावर गोळ्या झाडत हत्या केली. आरोपीने आपला गुन्हा पोलिसांच्या समोर कबुल केला आहे.(Shocking! 99 वर्षाच्या वृद्ध महिलेवर बलात्कार; 48 वर्षीय केअरटेकरचे विकृत कृत्य, सुनावली जन्मठेपेची शिक्षा)

पाकिस्तानातील HRCP च्या या सर्व आकडेलवारीनुसार दररोज बलात्काराची 11 प्रकरणे समोर येतात. तसेच गेल्या 6 वर्षांमध्ये 22 हजार अशा घटना घडल्या आहेत. एचआरसीपीच्या रिपोर्ट्सनुसार, महिलांवर बलात्कार करणाऱ्यांना परिवारातच संरक्षण दिलेजाते. परिवाराने त्यांना काही सुनावण्याऐवजी पीडित मुलीलाच दोषी ठरवतात. यामुळे आतापर्यंत 22 हजार प्रकरणातील 77 प्रकरणे अशी आहेत ज्यामध्ये आरोपींना दोषी ठरवण्यात आले. टक्केवारीनुसार पाहिल्यास आरोपींना दोषी ठरवण्याचा दर 0.3 टक्के आहे. रेकर्डनुसार,  जगाच्या तुलनेत पाकिस्तानाता अब्रुच्या नावाखाली बलात्कार आणि हत्या सर्वाधित होतात.