इंग्लंडमधील लँकेशायर शहरातील मुख्य वस्ती असलेल्या ब्लॅकपूलमध्ये (Blackpool) एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका 48 वर्षीय व्यक्तीने 99 वर्षीय स्मृतिभ्रंश रुग्णावर बलात्कार (Rape) केला आहे. महत्वाचे म्हणजे फिलिप केरी (48) नावाच्या माणसाची या डिमेंशियाच्या रुग्णाची काळजी घेण्यासाठी नियुक्ती केली होती. ही घटना पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी खोलीत लावलेल्या छुप्या कॅमेऱ्यात कैद केली. पीडित महिलेच्या कुटुंबाच्या वतीने हे प्रकरण न्यायालयात नेण्यात आले, जेथे दोषी व्यक्तीला जन्मठेपेची तसेच किमान दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
इंग्लंडमधील प्रेस्टन क्राउन कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान आणि सर्व पुराव्यांच्या आधारे केअर वर्कर फिलिप कॅरीला दोषी ठरवण्यात आले आहे. खुद्द कॅरीनेही कोर्टात आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही 99 वर्षीय वृद्ध महिला डिमेंशियाग्रस्त आहे. तिची काळजी घेण्यासाठी फिलिप कॅरी नावाचा एक केअर वर्कर ठेवण्यात आला होता.
अचानक या असहाय महिलेच्या वागण्यात बदल झाल्याचे कुटुंबाला आले दिसून आले. महिला अजिबात शारीरिक संपर्क होऊ देत नव्हती. कुटुंबाने पीडितेच्या खोलीत गुप्त कॅमेरा बसवला होता. तिची योग्य काळजी घेतली जात आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी जेव्हा घरच्यांनी कॅमेऱ्यातील लाईव्ह फीड पाहिले तेव्हा त्यांना धक्काच बसला. फिलिप कॅरी महिलेवर बलात्कार करत असल्याचे दिसून आले. (हेही वाचा: महिलेने केले असे कृत्य की, पतीचा Private Part झाला खराब; आता कधीच करू शकणार नीही सेक्स!)
यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांना फोन केला. त्यानंतर कॅरीला अटक करण्यात आली. सरकारी वकिलांनी फॉरेन्सिक पुरावे आणि कॅमेरा फुटेज सादर केल्यानंतर आरोपी फिलीपनेही कोर्टात आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. वरिष्ठ अभियोक्ता सोफी रोझडोल्स्कीज यांनी शिक्षा सुनावल्यानंतर सांगितले की, फिलिप कॅरीने विश्वास तोडला आणि त्याचा गैरवापर केला. आरोपीने एका अश्हाय महिलेला टार्गेट केले, ज्यावर तिची काळजी घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.