महिलेने केले असे कृत्य की, पतीचा Private Part झाला खराब; आता कधीच करू शकणार नीही सेक्स!
प्रतीकात्मक फोटो (Photo Credits: Pixabay)

एका महिलेने तिच्या पतीच्या प्रायव्हेट पार्ट (Private Part) वर इन्सुलेशन स्प्रे (Insulation Spray) मारला. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, यापुढे पीडित पुरुष पुन्हा कधीही सेक्स करू शकणार नाही. खरं तर, एका 45 वर्षीय पुरुषाला प्रायव्हेट पार्टच्या काही समस्या होत्या आणि पत्नीने ही दुरुस्त करण्याच्या उद्देशाने भिंतीवरील पोकळी भरण्यासाठी वापरा जाणारा इन्सुलेशन स्प्रे पतीच्या प्रायव्हेट पार्टवर मारला.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, ही घटना अमेरिकेतील आहे. पत्नीच्या या कृत्यामुळे पुरुषाच्या प्रायव्हेट पार्टमध्येही जखमा झाल्या होत्या. तथापि, घटनेच्या तीन आठवड्यांनंतरही तो डॉक्टरांकडे गेला नाही.

पीडित व्यक्ती जखमा बऱ्या होण्याच्या आशेने वाट पाहत राहिला. त्यामुळे त्यांची तब्येत बिघडली. तीन आठवडे उपचार सुरू न झाल्याने त्या व्यक्तीच्या जखमा पसरल्या. त्याला लघवीचा त्रासही होऊ लागला. लघवी करण्याऐवजी त्यांच्या शरीरातून रक्तही येऊ लागले. नंतर शस्त्रक्रियेद्वारे व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमधून इन्सुलेशन मटेरियल काढण्यात आले. (वाचा - बाबो! पठ्ठ्याने गर्लफ्रेंडच्या आईला किडनी केली दान; 1 महिन्यानंतर तरुणीने दुसऱ्यासोबत थाटला संसार)

दरम्यान, पीडित पुरुषाच्या उपचारादरम्यान, डॉक्टरांना पेरीनियल युरेथ्रोस्टोमी नावाची जटिल शस्त्रक्रिया देखील करावी लागली. शस्त्रक्रियेनंतर हा पुरूष बरा होत असला तरी त्याला मूत्रमार्गावर आणखी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.

प्रायव्हेट पार्टमध्ये समस्या असल्यास लोक उशिरा हॉस्पिटलमध्ये जातात. अनेकदा डॉक्टर संकोच न करता रुग्णांना यासंदर्भात सूचना करत असतात. मात्र, काही लोक लाजेमुळे सुरुवातीच्या काळात डॉक्टरांकडे जाण्याचे टाळतात. परिणामी संबंधित आजार आणखी वाढण्याची शक्यता असते.