बाबो! पठ्ठ्याने गर्लफ्रेंडच्या आईला किडनी केली दान; 1 महिन्यानंतर तरुणीने दुसऱ्यासोबत थाटला संसार
प्रातिनिधिक प्रतिमा | (Photo credit: archived, edited, representative image)

‘ये इश्क नहीं आसां, बस इतना समझ लीजिए, आग का दरिया है और डूब के जाना है,’ ही ओळ आपण नक्कीच ऐकली असेल. प्रेमासाठी (Love) माणूस काहीही करू शकतो, म्हणूनच ‘प्रेम आंधळे असते’, असेही म्हणतात. प्रेमात एक प्रकारची शक्ती असते, ज्याच्या जोरावर कोणत्याही समस्यांना तोंड देण्याची ताकद येते. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो तिच्या आनंदासाठी आपण सर्वकाही करण्यास तयार होतो. मेक्सिकोच्या तरुणाच्या बाबतीतही असेच काहीसे घडले, परंतु या व्यक्तीला आपल्या प्रेमासाठी केलेल्या त्यागाचे मिळालेले फळ ऐकून तुम्ही डोक्यावर हात मारून घ्याल.

तर प्रेमात आकंठ बुडालेल्या एका व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंडच्या आईच्या स्वतःची किडनी (Kidney) दान केली. मात्र प्रेयसीच्या आईच्या ऑपरेशनच्या महिनाभरानंतर प्रेयसीने त्याच्यासोबतचे नाते तोडले. द सनच्या वृत्तानुसार, या व्यक्तीचे नाव उझील मार्टिनेझ (Uziel Martinez) आहे. तो व्यवसायाने शिक्षक असून मूळचा मेक्सिकोचा आहे. उझीलने त्याची स्टोरी Tiktok वर शेअर केली आहे. त्याने सांगितले की त्याने त्याची एक किडनी आपल्या मैत्रिणीच्या आईला दान केली मात्र त्यानंतर तिने त्याच्याशी ब्रेकअप केले.

इतकेच नाही तर, या प्रेयसीने दुसऱ्या व्यक्तीची लग्नही केले. उझीलने टिकटॉकवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो खूपच उदास आणि दुःखी दिसत आहे. या व्हिडिओला टिकटॉकवर 14 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. नंतर त्याने आणखी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये त्याने सांगितले की, जरी दोघे आता वेगळे झाले असले तरी, तो आणि त्याच्या एक्स गर्लफ्रेंडमध्ये अजूनही मैत्री आहे. तिच्याबाबत त्याला कोणतीही तक्रार नसल्याचे त्याने सांगितले. (हेही वाचा: विद्यार्थ्याला उत्तम गुण हवे असल्यास Sexual Relationship ठेवावे, युनिव्हर्सिटीच्या 5 प्रोफेसरांना सुनावली दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा)

दरम्यान, आरोग्य सुविधा सुधारण्याच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली गेली आहे. आता चक्क कृत्रिम किडनीची चाचणी यशस्वी झाली आहे. त्यामुळे डायलिसिस आणि किडनी प्रत्यारोपणापासून रुग्णांची मुक्तता होणार आहे. ही कृत्रिम किडनी बनवणाऱ्या टीमला 6 लाख 50 हजार डॉलर्सचे बक्षीसही मिळाले आहे.