प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Africa: एका युनिव्हर्सिटीच्या 5 प्रोफेसरांना लैंगिक संबंधाच्या बदल्यात उत्तम गुण देण्याप्रकरणी दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. प्रोफेरला अभद्र व्यवहार, लैंगिक शोषण आणि हिंसेच्या आरोपाखाली दोषी ठरवले आहे. हे प्रकरण अफ्रिकेतील मोरक्कोच्या Hassan I University येथील आहे. जो Settat शहरात आहे. हे प्रकरण ऐवढे मोठे झाले आहे की, बहुसंख्य लोकसंख्या असलेल्या देशात अशा प्रकारची घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

BBC च्या रिपोर्ट्सनुसार, मोरक्को मध्ये युनिव्हर्सिटीच मध्ये हायप्रोफाइल लैंगिक शोषणाप्रकरणी हे पहिलेच प्रकरण कोर्टात दाखल झाले आहे. कोर्टाने Hassan युनिव्हर्सिटीतील अर्थशास्राच्या एका प्रोफेरसने आपल्या विद्यार्थ्यांना लैंगिक शोषण केले. त्यामुळे त्याला दोषी ठरवण्यात आले आहे. तो विद्यार्थ्यांना उत्तम गुण देतो असे सांगून त्यांच्यासोबत लैंगिक शोषण करायचा.

हे प्रकरण अशावेळी समोर आले जेव्हा गेल्या वर्षात सप्टेंबर महिन्यात सोशल मीडियात विद्यार्थ्यी आणि प्रोफेसरदरम्यानचे चाट लीक झाले होते.  प्रोफेसरवर लावण्यात आलेल्या आरोपांमुळे मोरक्कोमधील सामान्य नागरिकांच्या मनात संपात निर्माण झाला आहे. आता हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहचले आहे.(Coloured Tattoos Ban in EU: युरोपियन देशांमध्ये रंगीत टॅटूवर उद्यापासून येऊ शकते बंदी; कलाकार नाराज, जाणून घ्या कारण)

रिपोर्ट्सनुसार, अशा प्रकारच्या घटनांची एक सीरिज आहे ज्यामुळे मोरक्कन युनिव्हर्सिटीजच्या प्रतिष्ठेला ठेच पोहचली आहे. दरम्यान, यापूर्वीच्या अशा घटनांकडे दुर्लक्ष केले जात होते. ह्युमन राइट्स ग्रुपचे असे म्हणणे आहे की, आम्ही अशा एका समाजातआ होत ज्यामध्ये लैंकिग हिंसेने व्यापक रुप घेतले आहे. परंतु पीडित आपल्या प्रतिष्ठेमुळे किंवा परिवाराच्या चिंतेमुळे आणि अन्य कारणांमुळे आपले अनुभव रिपोर्ट्स करण्यासाठी घाबरतात.