अमेरिकेतून लंडनकडे जाणाऱ्या फ्लाइटमध्ये बलात्कार, एअपोर्टवर उतरताच पोलिसांनी आरोपीला  ठोकल्या बेड्या
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Stock Photos)

अमेरिकेतील न्यू जर्सी येथून लंडनकडे जाणाऱ्या एका फ्लाइटच्या बिझनेस क्लासमध्ये महिला प्रवाशावर कथित रुपात बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान आरोपी व्यक्ती ब्रिटेन येथे अटक करण्यात आली आहे. त्यानंतर मात्र त्याला जामीन दिला गेला आहे. द सन यांच्या रिपोर्ट्सनुसार, घटनेच्या वेळी फ्लाइटमध्ये असलेले अन्य सहप्रवाशी झोपले होते. घटनेनंतर पीडित महिलेने युनाइडेट एअरलाइन्सच्या फ्लाइटमधील स्टाफला याबद्दल माहिती दिली. त्यांनी ब्रिटेनच्या पोलिसांना या संदर्भात सांगितले. न्यू जर्सी येथून लंडन पर्यंत पोहचण्यासाठी असलेल्या थेट फ्लाइटला 7 तासांचा कालावधी लागतो.

ब्रिटेनमध्ये हीथ्रो येथे फ्लाइटने लँन्डिंग केल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी विमानाकडे धाव घेत आरोपीला अटक केली. पीडितेला रेप काउसिलिंगमध्ये नेण्यात आले. तसेच पोलिसांकडून फ्लाइटमध्ये फॉरेंन्सिक तपास ही केला. परंतु हे प्रकरण गेल्या आठवड्यातील आहे. पीडिता आणि आरोपीचे वय 40 वर्ष असल्याचे सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीडिता आणि आरोपी ब्रिटेन येथे राहणारे आहेत.(Pakistan: पंजाबमध्ये 'इज्जतीच्या नावाखाली' 6 महिन्यात 2400 महिलांची अब्रु लुटली, 90 जणांची हत्या)

द सन यांच्या रिपोर्ट्सनुसार, आरोपी आणि पीडिता बिझनेस क्लासमध्ये होते. परंतु वेगवेगळ्या ठिकाणी बसले होते. दरम्यान, दोघे एकमेकांना आधीपासून ओखळत ही नव्हते. परंतु घटनेपूर्वी लाउंज एरियात पीडिता आणि आरोपीने एकत्रितपणे दारु प्यायले आणि बोलले सुद्धा होते.ब्रिटिश पोलिसांनी या प्रकरणी अटकेची पुष्टी केली आहे. तसेच अधिक तपास केला जात असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.