Close
Advertisement
 
शुक्रवार, डिसेंबर 27, 2024
ताज्या बातम्या
8 hours ago

US Shooting: शार्लोट, नॉर्थ कॅरोलिना, यूएसए येथे गोळीबार, 3 पोलिस अधिकारी ठार (व्हिडिओ पहा)

अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना राज्यातील शार्लोटमध्ये गोळीबार झाला आहे. शूटिंगनंतर संपूर्ण शार्लोटमध्ये दहशतीचे वातावरण आहे. या गोळीबारात तीन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. सीएनएनने सूत्रांचा हवाला देत वृत्तात म्हटले आहे की, नॉर्थ कॅरोलिनातील शार्लोट येथील निवासस्थानी हा गोळीबार झाला, पाहा व्हिडीओ

आंतरराष्ट्रीय Shreya Varke | Apr 30, 2024 10:38 AM IST
A+
A-
US Shooting

US Shooting: अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना राज्यातील शार्लोटमध्ये गोळीबार झाला आहे. शूटिंगनंतर संपूर्ण शार्लोटमध्ये दहशतीचे वातावरण आहे. या गोळीबारात तीन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. सीएनएनने सूत्रांचा हवाला देत वृत्तात म्हटले आहे की, नॉर्थ कॅरोलिनातील शार्लोट येथील निवासस्थानी हा गोळीबार झाला. ज्यामध्ये कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या तीन अधिकाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. वृत्तानुसार, मृत्यू झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये एक डेप्युटी यूएस मार्शल आणि दोन स्थानिक टास्क फोर्स अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

 अमेरिकेत गोळीबार:

याआधी रविवारी अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील सॅनफोर्ड शहरात एका पार्टीच्या ठिकाणी गोळीबार झाला होता. ज्यामध्ये 10 जण जखमी झाले आहेत. मात्र, पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या १६ वर्षीय संशयिताला अटक केली.


Show Full Article Share Now