US Shocker: आपल्या अल्पवयीन मुलाच्या लठ्ठपणाला कंटाळून त्याला हाय स्पीडमध्ये ट्रेडमिलवर धावण्यास भाग पाडणाऱ्या एका अमेरिकन वडिलांना कोर्टाने 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या आरोपी वडिलांना आता मुलाच्या हत्येप्रकरणी 20 वर्षे आणि बालकांवर अत्याचार केल्याबद्दल पाच वर्षे अशी 25 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ख्रिस्तोफर ग्रेगोर 31 वर्ष असे गंभीर हत्याकांडासाठी आरोपी वडिलांचे नाव आहे. 2 एप्रिल 2021 रोजी ही घटना उघडकीस आली होती. या घटनेत 6 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. (हेही वाचा:Brazil Boat Tragedy:ॲमेझॉन नदीत बोटीचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना! एम मॉन्टेरोला बोट उलटली, 3 ठार, 9 बेपत्ता )
ख्रिस्तोफर ग्रेगोरला या घटनेच्या व्हिडिओमुळे पकडण्यात आले. कोरी मिचिओलो असे मृत मुलाचे नाव आहे. कोरी मिकिओलोला हाय स्पीडमध्ये ट्रेडमिलवर पळवल्यामुळे तो वारंवार ट्रेडमिलवरून खाली पडला. आरोपी ख्रिस्तोफरला शिक्षा सुनावताच त्याने मुलाच्या हत्येपर्करणात काही केले नसल्याचे म्हटले, असे न्यूयॉर्क टाईम्सने वृत्त दिले. (हेही वाचा:Earthquake in Tokyo: जपानच्या टोकियो शहरात 4.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; कानागावा आणि चिबा प्रीफेक्चरमध्येही जाणवले हादरे )
“मी खात्रीशीर सांगतो की, 2 एप्रिल रोजी कोरीच्या निधनासाठी काहीही केले नाही. मी माझ्या मुलाला दुखावले नाही. मी त्याच्यावर प्रेम करत होतो आणि अजूनही करत आहे. त्याला लवकर दवाखान्यात नेले नाही याचे मला दु:ख आहे. तो किती आजारी आहे हे मला माहीत नव्हते. मला वाटले की तो थकला आहे, त्यामुळ मी त्याला डॉक्टरकडे नेले नव्हते” असे ग्रेगर म्हणाला.
व्हिडिओमध्ये ख्रिस्तोफर ट्रेडमिलचा वेग वाढवताना दिसत आहेत, ज्यामुळे कोरी सहा वेळा ट्रेडमिलवरून पडला. त्यानंतर कोरी आजारी पडला होता. तो चालतानाही अडखळत होता आणि त्याचे शब्द अस्पष्ट होते.दुखापती इतक्या गंभीर होत्या की त्याची सीटी स्कॅन दरम्यान शुद्ध हरपली. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आपत्कालीन उपचार करण्यास भाग पाडले. तथापि, उपचारादरम्यान कोरीचा मृत्यू झाला.
US man forced 6-year-old son to run on treadmill for being 'too fat' before death#DeltaTimes #US #Man #Run #Treadmill #Fat #Death pic.twitter.com/5nuhNmzhTy
— Delta Times (@DeltaTimes0) May 2, 2024
क्रिस्टोफर ग्रेगरला जुलै 2021 मध्ये याप्रकरणी अटक करण्यात आली होती. कोरीच्या वैज्यकीय अहवालात, त्याच्या छातीवर आणि पोटावर जखमा आढळल्या. डाव्या फुफ्फुसाला दुखापतदेखील झाल्याचे आढळले. त्याच्या यकृतालाही जखमा होत्या.