COVID-19: अमेरिकेत गेल्या 24 तासांत 1997 कोरोना बाधितांचा मृत्यू- AFP
प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

जगभरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून गेल्या 24 तासांत अमेरिकेत 1997 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती AFP न्यूज एजन्सीने दिली आहे. जगभरात एकूण 24,06,910 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यातील 1,65,059 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेत (United State of America) कोरोना बाधितांची एकूण संख्या 7,64,265 झाली असून एकूण 40,565 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी खूपच धक्कादायक असून या संपूर्ण जगभरात कोरोना विरुद्धचा लढा हा सुरु असून ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत.

भारतात कोरोना बाधितांच्या तुलनेत जगभरातील अन्य देशांमध्ये कोरोना ने हाहाकार उडविला आहे. अमेरिकेनंतर स्पेन मध्ये 1,98,674 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यातील 20,453 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना वायरस फैलावासाठी चीन सरकारला जबाबदार धरावे; US Secretary of State Mike Pompeo यांचा Xi Jinping सरकारच्या भूमिकेवर हल्लाबोल

भारतात कोरोना बाधितांची एकूण संख्या 17,265 वर पोहोचली असून 2547 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर 543 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

दरम्यान अमेरिकन राष्ट्राध्याक्ष डॉनल्ड ट्रम्प पाठोपाठ आता US Secretary of State Mike Pompeo यांनीदेखील चीनवर निशाणा साधत जगभरात पसरणार्‍या कोरोनाच्या फैलावाला चीनला जबाबदार धरलं पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान काल 24 तासामध्ये अमेरिकेत सुमारे 1,891 बळी गेले आहेत तर कोरोनाबाधितांचा आकडा 7 लाख 38 हजारांच्या पार गेला आहे. दरम्यान न्यू यॉर्क शहरामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आढळले आहेत.